17 वर्षे मुले/मुलीकरिता राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचे 22 ते 23 जानेवारी रोजी आयोजन.

17 वर्षे मुले/मुलीकरिता राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचे 22 ते 23 जानेवारी रोजी आयोजन.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे आयोजन येत्या 22 ते 23 जानेवारी, 2025 या कालावधीत श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत राज्यातील मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, लातुर, संभाजीनगर, कोल्हापूर व नाशिक असे एकूण आठ विभाग सहभागी होत असुन 17 वर्षे आतील मुलांचे 8 संघ व 17 वर्षे आतील मुलींचे 8 संघ असे एकुण 16 संघांतील एकुण 192 खेळाडू, प्रत्येक संघासोबत 1 व्यावस्थापक व 1 क्रीडा मार्गदर्शक असे एकूण 32 संघ व्यावस्थापक व क्रीडा मार्गदर्शक, 20 पंच व संघटनेचे पदाअधिकारी असे एकूण 250 व्यक्ती यात सहभागी होत आहेत.

या राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम दि. 23 जानेवारी, 2025 सांयकाळी 04.00 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
या स्पर्धेत राज्यातील नामवंत डॉजबॉल खेळाडू सहभागी होत असून या खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी जळगाव जिल्हयातील शाळा / महाविद्यालयातील विद्यार्थी / खेळाडू व जळगांवातील नागरीकांना स्पर्धेच्या माध्यमातुन उपलब्ध होणार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.