संजय रॉयला फाशी किंवा जन्मठेप! कोलकातामधील प्रकरणावर १६२ दिवसांनी निर्णय

२०२४ मध्ये ८-९ ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या घटनेच्या सुमारे १६२ दिवसांनंतर, न्यायालयाने शनिवारी आपला निर्णय दिला. आणि संजय रॉय याला दोषी ठरवले. या प्रकरणाची सुनावणी सुमारे ५७ दिवस चालली. यापूर्वी या प्रकरणाचा तपास कोलकाता पोलिस करत होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.कोलकातामधील बलात्कार व हत्याकांडप्रकरणी आरोपी संजय रॉयला, आज शिक्षा सुनावली जाणार आहे. याप्रकरणी सियालदह न्यायालयाने शनिवारी संजयला दोषी ठरवले होते. सीबीआयने आरोपी संजय रॉयला फाशी देण्याची मागणी केली आहे. संजयकडे आता फक्त फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेचा पर्याय उरला आहे. शिक्षेवरील चर्चेदरम्यान, सीबीआय दोषीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करेल. यावरुन, सीबीआय त्याला कोणत्याही परिस्थितीत फाशीची शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करेल हे स्पष्ट आहे.दुसरीकडे संजय रॉयचे वकील त्याला फाशीची शिक्षा न मिळता, जन्मठेपेची शिक्षा देऊन मानवतावादी आधारावर सोडण्याचे आवाहन करणार आहेत. ९ ऑगस्ट २०२४ रोजी कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये ३१ वर्षीय महिला डॉक्टरवर क्रूरपणे हल्ला करण्यात आला. आधी तिच्यावर बलात्कार झाला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली होती. गेल्या वर्षी १२ नोव्हेंबर रोजी सीबीआय कोर्टाने बंद खोलीत सुनावणी सुरू केली होती.
५७ दिवसांनंतर सियालदह जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अनिर्बन दास यांनी, त्याला दोषी घोषित केले. तसे, सियालदह न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आपल्या निकालात म्हटले आहे. कोर्टाने फॉरेन्सिक रिपोर्टवर विश्वास ठेवला. या अंतर्गत न्यायालयाने या प्रकरणात संजय रॉय याला दोषी ठरवले. या प्रकरणी आज न्यायालय संजय रॉय याला शिक्षा सुनावणार आहे.शनिवारी सियालदह न्यायालयाने संजय रॉय याला दोषी घोषित केले तेव्हा संजयने न्यायाधीशांना सांगितले की, तो दोषी नाही. मला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. मी हा गुन्हा केला नाही. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना सोडण्यात येत आहे. आरोपीविरुद्ध भादंवि कलम ६४,६६, १०३/१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेमिनार रुममध्ये जाऊन डॉक्टरवर हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा आरोप संजयवर आहे.२०२४ मध्ये ८-९ ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या घटनेच्या सुमारे १६२ दिवसांनंतर, न्यायालयाने शनिवारी आपला निर्णय दिला. आणि संजय रॉय याला दोषी ठरवले. या प्रकरणाची सुनावणी सुमारे ५७ दिवस चालली. यापूर्वी या प्रकरणाचा तपास कोलकाता पोलिस करत होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सीबीआयने १३ ऑगस्ट रोजी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. यानंतर तपास सुरू करण्यात आला. १२०हून अधिक साक्षीदारांचे जबाब सीबीआयने नोंदवले. या प्रकरणी कॅमेरा ट्रायल सुमारे दोन महिने सुरू होती.
  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.