पालकमंत्रिपदाला स्थगिती; नाशिक, रायगडमधील नाराजीनंतर राज्य सरकारचा निर्णय

रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला न आल्याने नाराजी निर्माण झाली होती. यानंतर राज्य सरकारने आपल्या या जिल्ह्यांबाबतच्या निर्णयाला रविवारी स्थगिती दिली. तत्पूर्वी शिवसेनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी महाड येथे टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले होते.राज्य सरकारतर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली. रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला न आल्याने नाराजी निर्माण झाली होती. यानंतर राज्य सरकारने आपल्या या जिल्ह्यांबाबतच्या निर्णयाला रविवारी स्थगिती दिली. तत्पूर्वी शिवसेनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी महाड येथे टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले होते.राज्य मंत्रिमंडळाच्या नव्या पालकमंत्रिपदाची घोषणा शनिवारी करण्यात आली होती. यात बहुचर्चित रायगडच्या पालकमंत्रिपदाची धुरा राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे, तर नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आले होते. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या भरत गोगावले यांना मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र गोगावले यांना डावलण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला. तर ‘हा निर्णय अनपेक्षित व धक्कादायक आहे,’ अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली होती.
गोगावले यांच्या समर्थकांनी रविवारी महाड येथे मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. तसेच, अदिती तटकरे व खा. सुनील तटकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांनी दोन तास महामार्ग रोखून धरला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करीत शिवसैनिकांना बाजूला केले आणि मार्ग मोकळा केला. जाळपोळ करण्यात आलेल्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे. पालकमंत्रिपदाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे सामूहिक राजीनामे पाठवले. खा. तटकरे यांना महाडमध्ये फिरू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.रायगडमधील शिवसेनेच्या वृक्षाला मुळापासून उपटता आले नसले तरी तो छाटण्याचे प्रयोग भाजप व खा. तटकरे करीत असल्याची चर्चा ऐकावयास मिळते आहे. पालकमंत्रिपदाचा मुद्दा भविष्यात चिघळणार की थंड होणार, याकडे रायगडचे लक्ष लागले असून जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या वादाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेमध्ये महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या जिल्हा संपर्कप्रमुखपदाचा प्रकाश देसाई यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे रायगडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दैनंदिन व्यग्र जीवनशैली व दैनंदिन कामातून पक्षाच्या कामास आवश्यक तो वेळ देता येत नसल्याने तसेच पक्षासाठी समाधानकारक काम करता येत नसल्याने मी राजीनामा देत असल्याचे देसाई यांनी या पत्रात म्हटले आहे. प्रकाश देसाई यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.