महाराष्ट्रातील पत्रकारिता मूल्य जपणारी : जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी.

महाराष्ट्रातील पत्रकारिता मूल्य जपणारी : जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी. देशातील पत्रकारितेमध्ये महाराष्ट्रातील पत्रकारितेचे वेगळे महत्व आहे. येथील पत्रकारिता आजही मूल्यांची जपणूक करताना दिसते, असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी काढले.महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीची बैठक जळगाव येथे सुरू आहे. यावेळी समिती सदस्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. राज्य समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक सर्वश्री डॉ. गणेश मुळे, किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे यांच्यासह समितीचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना  रेड्डी म्हणाले की, महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. राज्याची ही प्रतिमा तयार करण्यात येथील प्रसार माध्यमांचे मोठे योगदान आहे. नैतिक मूल्ये जपत पत्रकारिता राज्यात होते ही अभिमान आणि समाधानाची बाब आहे. त्यामुळेच, राज्यात काम करण्यातांना चांगला अनुभव घेता येतो असे त्यांनी नमूद केले.यावेळी अध्यक्ष  जोशी यांनी स्वागतपर प्रास्ताविकात राज्य अधिस्वीकृती समितीच्या कामकाजाविषयी माहिती दिली. राज्य समितीद्वारे राज्यातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मंजूर केली जाते. या अधिस्वीकृती पत्रिकेच्या माध्यमातून पत्रकारांना राज्य शासनातर्फे विविध लाभ दिले जातात, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी समिती सदस्य महेश तिवारी यांनी विचार व्यक्त केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.