रिफिलिंगचे अवैध अड्डे उद्ध्वस्त तर २५ गॅस सिलिंडर जप्त, भुसावळात धडक कारवाई .

भुसावळ शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गॅस रिफिलिंगचा अवैध व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहे. या संदर्भात पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्याने १७ रोजी भुसावळ शहरातील दोन अवैध रिफिलिंगच्या अड्ड्यांवर एकाच वेळी छापे मारून कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ४६ हजारांच्या मुद्देमालासह एकाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील बाजारपेठ पोलीस ठाणे तसेच शहर पोलीस ठाणे हद्द अशा दोन्ही ठिकाणी टाकलेल्या छाप्यात २५ गॅस सिलिंडर, दोन रिफिलिंग मशीन, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा तसेच एक रिक्षा वाहन जप्त करुन दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

त्यामुळे अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.दरम्यान, भुसावळ शहर बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील पांडुरंग टॉकीज जवळील राहुल नगर भागात गॅस रिफिलिंग व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस विभाग व महसूलचा पुरवठा विभाग या दोघांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचले. तेथे एक व्यक्ती रिक्षा (एमएच १९, एई ९९४४) मध्ये मशीनव्दारे गॅस रिफिलिंग करताना आढळून आला.

त्यास पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एचपी कंपनीचे २० गॅस सिलिंडर, एक रिफिलिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, एक रिक्षा असा ४६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून बाजारपेठ पोलीस ठाण्यात जमा केला. ही कारवाई पो.नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो. नि. अमित बागुल, सोपान पाटील, भूषण चौधरी, तहसील विभागाचे पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे व पुरवठा अधिकारी रोशन रेवतकर यांच्या पथकाने केली. तर बाजारपेठ पोलीस ठाणे तसेच शहर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.