चाळीसगावात भीषण अपघात : ट्रकच्या धडकेत वृद्ध जागीच ठार .

चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत ६२ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. यामुळे दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील ६२ वर्षीय वृद्ध ज्ञानेश्वर ईश्वर सूळ हे आज शनिवार बाजाराचा दिवस असल्याने बाजार करण्यासाठी चाळीसगाव येथे आले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्कलजवळ त्यांना ट्रकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुख्य चौकात घडलेल्या या घटनेमुळे घटनास्थळी लागलीच मोठा जमाव जमल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.घटनेचे गांर्भिय ओळखून तत्काळ वाहतूक शाखेचे पोलीस तसेच शहर पोलीस ठाण्यातील पोलीस दाखल झाले. त्यानंतर मयत ज्ञानेश्वर सूळ यांना तत्काळ शासकीय रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलवून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या घटनेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नल बसवावेत व ब्रेकर टाकावेत, अशी नागरिकांकडून होत असलेली मागणी आज पुन्हा जोर धरु लागली आहे. दरम्यान, गेल्या २ महिन्यात याच ठिकाणी हा दुसरा अपघात झाल्याने नागरिकांकडून त्वरित सिग्नल बसवण्याची मागणी होत आहे

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.