अख्खं कुटुंब झोपेत, दरोडेखोरांनी भल्यापहाटे घर फोडलं, महिला डॉक्टरची हत्या.

झटापटी दरम्यान दरोडेखोरांनी माधुरी टेकाळे यांचा जीव घेतला असावा, असा संशय आहे. गजानन टेकाळे अत्यवस्थ असून त्यांना मलकापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्याही मेंदूवर मार बसल्याचे समजते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी दाभाडीकडे प्रयाण केले आहे. सदर घटनेने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे.मुंबईमध्ये अभिनेता सैफ अली खान यांच्या घरामध्ये मध्यरात्री चोरट्याने लुटून त्यांच्यावर केलेला जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर दरोडा टाकण्याच्या इराद्याने आलेली घटना ताजीच असताना बुलढाण्यात देखील काल मध्यरात्री एका डॉक्टरच्या घरामध्ये दरोडेखोर घुसून डॉक्टर पत्नीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे नेमकं आता मुंबईपासून गाव शहर खेडे किती सुरक्षित आहे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जीवघेणा दरोडा पडला आहे. लूटमारी करताना दरोडेखोरांनी एका महिलेचा जीव घेतला. दाभाडीच्या बस स्टँडजवळ दाताळा रोडवर पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे यांच्या घरी काल मध्यरात्री हा दरोडा पडला. त्यांच्या पत्नी माधुरी टेकाळे यांचा या दरोड्यामध्ये जीव गेला आहे. घरात पती-पत्नी दोघेच होते. दहाव्या वर्गात शिकणारी मुलगी सहलीनिमित्त बाहेर होती. सकाळी पाच वाजता सदर दरोडा पडल्याची घटना लक्षात आली. कारण डॉक्टर गजानन टेकाळे बेशुद्ध अवस्थेमध्ये होते.
तर त्यांच्या पत्नी माधुरी टेकाळे गतप्राण झालेल्या होत्या. मृतक माधुरी टेकाळे यांचा चेहरा पूर्णपणे काळा पडलेला होता. दरोडेखोरांनी बेडरूममध्ये असलेले कपाटे तोडून दागिने आणि कॅश चोरून नेले.झटापटी दरम्यान दरोडेखोरांनी माधुरी टेकाळे यांचा जीव घेतला असावा, असा संशय आहे. गजानन टेकाळे अत्यवस्थ असून त्यांना मलकापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्याही मेंदूवर मार बसल्याचे समजते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी दाभाडीकडे प्रयाण केले आहे. सदर घटनेने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. दरोडा टाकून दरोडेखोर पसार झाले. आज सकाळी ५ वाजेदरम्यान जेव्हा टेकाळे यांचे नातेवाईक घरी पोहोचले तेव्हा सदर प्रकार समोर आला.गेल्या काही दिवसात मोताळा तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी वाघजाळ येथे पडलेल्या दरोड्याचा अद्याप उलगडा झालेला नाही. तसेच मोताळा शहर आणि बोराखेडी परिसरात झालेल्या मोठ्या चोऱ्यांमध्येही पोलिसांना अद्याप यश मिळालेले नाही. या घटनेनंतर नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल नाराजी आहे. चोरट्यांचा शोध लावून नागरिकांना संरक्षण मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.