भयंकर! मुलबाळ होत नसल्याने पतीची हत्या; मृत व्यक्तीचे दोन विवाह, पत्नीसह दोन भावांवर गुन्हा दाखल.

अपत्य होत नसल्याने पत्नीने तिच्या दोन भावांच्या साथीने पतीवर चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आडगाव पोलिसांच्या हद्दीतील हिंदुस्थान नगराजवळील रस्त्यावर घडली.  अपत्य होत नसल्याने पत्नीने तिच्या दोन भावांच्या साथीने पतीवर चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आडगाव पोलिसांच्या हद्दीतील हिंदुस्थान नगराजवळील रस्त्यावर घडली. याप्रकरणी आडगाव पोलिसांत पत्नीसह तिच्या भावांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुनीता नागेश शिंदे, राज व आदित्य शिंदे अशी संशयितांची नावे आहेत. शुक्रवारी (दि. १७) रात्री उशिरा भावसार मूलचंद पवार उर्फ बाल्या (वय ४५, रा. बडोदरा गुजरात) याचा खून करण्यात आला. भावसार हा रस्त्यावर किरकोळ वस्तू विक्री करायचा. त्याचा संशयित सुनीता हिच्याशी दुसरा विवाह झाला होता. त्याची पहिली पत्नी निरमा पवार (वय ३०) हिने आडगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार शनिवारी (दि. १८) सुनीतासह दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. संशयित व मृत व्यक्तिचे कुटुंब रस्त्यालगत राहात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी निरमा ही पती भावसार आणि अकरा वर्षीय मुलगी आलमसोबत गुजरातहून आडगावमध्ये आईवडिलांना भेटण्यासाठी आली. त्यावेळी निरमा व सुनीता या सवतींमध्ये पतीशी लग्नावरून तसेच अपत्य होत नसल्याच्या कारणात वाद सुरू झाले. सुनीताचे सख्खे भाऊ राज व आदित्यही त्यात पडले. दिवसभर काहीतरी कारणातून सतत खटके उडाल्यानंतर रात्री साडेआठ वाजता भावसारच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे निरमा व इतर नातलगांनी धाव घेतली. यावेळी सुनीता, तिचे दोन भाऊ तसेच नातलग दीपक व एक अनोळखी व्यक्ती भावसारला मारहाण करीत होते. राजने भावसारच्या पोटावर, छातीवर, पाठीत चाकूने वार केले. आदित्यने डोक्यात रॉड टाकून जखमी केले.रक्तबंबाळ अवस्थेत भावसार पत्नी निरमाजवळ आला. त्याला निरमासह इतरांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सहायक आयुक्त पद्मजा बढे, आडगावचे वरिष्ठ निरीक्षक सचिन खैरनार, सहायक निरीक्षक निखिल बोंडे यांचे पथक दाखल झाले. त्यांनी संशयित सुनीताला ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू आहे.
  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.