वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू माफियांची दबंगगिरी वाढली असून त्यांच्याकडून महसूल पथकावर होणारे हल्ले देखील वाढताना दिसत आहे. अशातच पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथे अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्याने वाळू माफियांनी वाद घालत महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. पथकातील तलाठ्याला एकाने ट्रॅक्टरवरून खाली ओढले. याबाबत चार जणांना अटक करण्यात आली आहे. राज भाऊसाहेब पाटील, दुर्गेश ऊर्फ नानू भाऊसाहेब पाटील, विवेक ऊर्फ भावड्या वसंत पाटील, हिरालाल निंबा पाटील (सर्व रा. अंतुर्ली, खुर्द, ता. पाचोरा) अशी अटक करण्यात आलेल्या वाळू माफियांची नावे आहेत.

अंतुर्ली खुर्द येथे अवैधरीत्या वाळूचा साठा करण्यात आल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली होती. यानंतर महसूल विभागातील चार जणांचे पथक या गावात पोहचले. त्यात निपाणे तलाठी तात्याराव माणिकराव सपकाळ, बाळद बुद्रुकचे तलाठी अतुल बापूराव पाटील, पुनगावचे तलाठी तेजस रोहिदास बहऱ्हाटे आणि पाचोरा तलाठी गंगाधर अण्णाराव सुरनर यांचा समावेश होता.पथक तिथे पोहचले त्यावेळी एक ट्रॅक्टर गिरणा नदी पात्रातून येताना दिसले. पथकाने हे वाहन थांबवले असता, वाळू माफियांनी पथकाला मारहाण केली. तलाठी अतुल पाटील ट्रॅक्टरवर चढले असता त्यांना खाली ओढत वाळू माफियांनी ट्रॅक्टर पळवून नेले. त्याठिकाणी ६४ हजार रुपयांची अवैध वाळू जप्त करण्यात आली.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.