धरणगाव – सोनवद जिल्हापरिषद शाळेच्या कंपाऊंड शेजारी अवैध्य रीतीने विट भट्टी सर्रास पुणे सुरूप्रशासनाचा मात्र कामा डोळा. वीट भट्टी मालकाचा लहान शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ धरणगाव – सोनवद येथिल जिल्हा परिषदेच्या शाळेला लागुन अवैध रीतीने विट भट्टी सुरू आहे तरी या सर्व गोष्टी शासनाच्या निदर्शनास का आल्या नाहीत अशा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे, जिल्हा परिषद शाळेत देशाचे भवितव्य घडवणारे लहान बालकांनचे आरोग्याशी हा खेळ खेळला जात आहे का सर्रास पणे कोणतीही परवानगी न घेता विट भट्टी सुरू आहे
या विट भट्टी मुळे प्रदुषण वाढते , विविध प्रकारचे घातक केमिकल वापरले जाते, या मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आहे की नाही, अशा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, या विट भट्टी मध्ये दगडी कोळशाच्या ज्वालानंतर सल्फर डाय ऑक्साईड कार्बन डाय ऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन मधील ऑक्साईड या विषारी वायूचे उत्सर्जन होते या विषारी वायू मधील सल्फर डाय ऑक्साईड मुळे डोळ्यांचे विविध विकार आणि हवेतील नायट्रोजन मधील डाय-ऑक्साइडमुळे फुफुसाचे व त्वचेचे आजार होतात तसेच कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन-डाय-ऑक्साइड या विषारी वायू निर्माण होत असतात वीटभट्टी चालकाने प्रदूषण नियंत्रण मंडळाची कुठलीही परवानगी न घेता सर्रासपणे विट भट्टी सुरू आहे. विद्यार्थी विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना व कायदे अंमलात आणतात आणि काही ठिकाणी अधिकारी शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून नियमबाह्य कामाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात. अशी चर्चा नागरिकांन मध्ये होत आहे,









