जळगावात वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणची कारवाई; 175 मीटर जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर आणि त्याच्या परिसरात वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने व्यापक मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत महावितरणचे ३८ पथके सहभागी झाली आणि वीजचोरी करणाऱ्या १८५ प्रकरणांवर कठोर कारवाई केली. या कारवाईत १७५ वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले, ज्यामुळे ते जप्त करण्यात आले.महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय आँढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव विभागात २८ कक्षांमध्ये विशेष मोहीम राबवली गेली. नशिराबाद, असोदा, म्हसावद आणि जळगाव शहरातील विविध ठिकाणी वीजचोरीचे प्रकार उघडकीस आले. महावितरणच्या पथकांनी निरीक्षणात आणलेल्या मीटरमध्ये आकडे टाकून वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आणले.

महावितरणच्या जळगाव विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता गोपाळ महाजन यांनी सांगितले, “अनधिकृत वीजवापर रोखण्यासाठी अधिकृत वीज जोडणी आवश्यक आहे. नागरिकांनी लवकरात लवकर वीज चोरी थांबवून अधिकृत जोडणीसाठी पुढाकार घ्यावा. वीज चोरीमुळे केवळ आर्थिक तोटा नाही तर तांत्रिक यंत्रणेलाही हानी पोहोचते.” जप्त केलेल्या १७५ संशयास्पद वीज मीटरची तपासणी सुरू आहे.महावितरणने ग्राहकांना वीज चोरी टाळण्यासाठी प्रोत्साहित करत योग्य मार्गदर्शन केले आहे. या मोहिमेत महावितरणच्या ३८ पथकांनी एकत्रित काम करत वीजचोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली. या कारवाईमुळे जळगाव शहर आणि ग्रामीण भागातील वीजचोरीला आळा बसला असून, भविष्यात अशा प्रकारांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महावितरणच्या या कठोर पावलांमुळे वीजचोरी करणाऱ्यांना धडा मिळाला असून, वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.