रस्ते बनवलेत तर खड्डे कसे? शिवराम पाटील.

रस्ते बनवलेत तर खड्डे कसे? शिवराम पाटील

मागील दहा वर्षे जळगाव शहरातील रस्ते पार उखडले होते.रोज अपघात होत असत.तरीही कोणतेही काम केले नाही.कारण देत.अमृत योजना.लोक ऐकून चूप बसत.पण आता अमृत योजना पुर्ण झाली.रस्ते, गटारी बनवल्या.मक्तेदार आणि त्याचा सुत्रधार गब्बर झाला.पण आमचा नागरिक तेच हाल भोगत आहेत,जे आधी होते.


जळगाव शहरातील ४२ रस्ते व गटारी असा सर्वच कामांचा ठेका एकाच ठेकेदाराला दिला.कोण होता हा सुत्रधार?हाच तो नालायक, लाचखोर , हरामखोर.मग तो आमदार असो कि मंत्री असो.या नालायकांनी जागोजागी कुदळ मारून उद्घाटन केले.बैनर लावून फोटो चमकवले.तर मग आता खड्डे सुद्धा तुम्हीच ठेवले.या पापाचे धनी पण तुम्हीच आहात.तुम्ही आमदार असा कि मंत्री असा.पण तुम्ही जनतेशी बेईमानी केली आहे.तुम्ही हरामखोरी केली आहे.ज्या ज्या आमदारांनी, मंत्री ने कूदळ मारले,बैनर झळकावले तोच खरा चोर आहे.
जळगाव मधील पेपरला बातमी येते.येथे खड्डा आहे.पण जबाबदार आमदार आणि मंत्री चे नांव देत नाहीत.पण जेंव्हा हाच नालायक कुदळ मारत होता तेंव्हा त्याचे फोटो पेपर ला झळकत होते.जसे याच आमदार आणि मंत्री चे शेत घर विकून रस्ता बनवला जात आहे.तिकडे गोदी मेडिया चालतो.इकडे पेड मेडिया चालतो.कुदळ मारले तर अभिनंदन केले पण खड्डा पडला तर निषेध का नाही केला?
आम्ही जळगाव शहरातील रस्ते पाहाणी करीत असता अनेक नगरसेवक हात धरून रस्ता दाखवत होते.बघा,हा रस्ता मी बनवला.पांच टक्के देऊन मी निधी आणला.आता त्याच रस्त्यावर भेगा पडल्या, खड्डे पडले तर तेच नगरसेवक तोंड लपवत आहेत.आता कुठे लपून बसले नगरसेवक?


जळगाव शहरातील नगरसेवक आणि आमदार हे नागरिकांच्या सोयीसाठी, हितासाठी काम करीत नाहीत.ते त्यांच्या उत्पन्नासाठी काम करतात.त्यांना दहा टक्के मिळावे म्हणून पांच टक्के देऊन निधी आणतात.रस्ता बनवितांना कमीशन टक्केवारी काढून घेतात.म्हणून ठेकेदार सिमेंट कमी वापरतो.डांबर कमी टाकतो.हे आमदार ,नगरसेवक, इंजिनिअर जर कमीशन घेत असतील तर ठेकेदार घरे दारे विकून देणार का?तो सिमेंट, डांबर,रेती,खडी कमी वापरून पैसा वाचवतो.त्यातूनच या चोरांना , हरामखोरांना देतो.रस्ते कंडेम बनवतो.ते उखडतात.भेगा पडतात.याला जबाबदार कोण? फक्त ठेकेदार नाही.तो तर कागदोपत्री जबाबदार धरला जातो.पण खरा जबाबदार तर तुम्ही आपण निवडून दिलेले चोर आहेत.आमदार आणि नगरसेवक.जे निवडणुकीत मतांचे पैसे देतात.जे नवरात्री,शिवरात्री ला देणगी देतात.आणि आपले मुर्ख आणि भिकारडे नागरिक खुष होतात.येथे नैतिक पतन झाले म्हणून जळगाव बरबाद झाले.

आपण नागरिक तर या आमदार आणि नगरसेवकांना कल्हई करुन सुधारू शकत नाही.तर आपण नागरिक त्यांना निवडणुकीत डावलू शकतो.जसे मोदी शहा म्हणत चार सौ पार.पण मतदारांनी तिनशे पार सुद्धा जाऊ दिले नाही.आता छप्पन्न इंच छाती छत्तीस इंच उतरली आहे.मोदी आणि शहा नरम पडले आहेत.तसेच आपण जळगाव च्या नागरिकांनी आमदार आणि नगरसेवकांना निवडणुकीत पटकणी दिली तर यांचे कमीशन खाल्लेले वाया जाईल.नवीन आलेले दचकून वचकून राहातील.इमानदारी चे महत्व कळेल.आजी माजींना.तिच तर खरी मेख आहे,मतांची.

  • Related Posts

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    एका डॉक्टरनेच ख्रिसमस मार्केटमध्ये भरधाव कार घुसवली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरने केलेल्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तालेब याने भर…

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    एका डिलिव्हरी बॉयने पार्सल देताच स्फोट झाला. या स्फोटात डिलिव्हरी बॉय आणि पार्सल घेणारी व्यक्ती जखमी झाली. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतले असून, जुन्या वैमनस्यातून हा स्फोट घडवल्याचा संशय आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न