बहुराज्यीय बँकांना बुडविण्यात वाल्मिक कराड आणि त्याच्या नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप धस यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही पवार यांच्याकडे केल्याचे धस यांनी सांगितले.बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणारे आमदार सुरेश धस यांनी बुधवारी, सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीतही धस यांनी बहुराज्यीय बँकांना बुडविण्यात वाल्मिक कराड आणि त्याच्या नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप धस यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही पवार यांच्याकडे केल्याचे धस यांनी सांगितले.
देशमुख हत्येनंतर धस यांनी सातत्याने नवनवीन दावे केले आहेत. वाल्मिक कराड याच्यासह त्यांच्या नेत्यांचाही सहभाग असल्याचे ते सातत्याने सांगत आहेत. त्यातच, मंगळवारी रात्री धस यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी दुपारी पुन्हा धस यांनी पवार यांची भेट घेतली. मराठवाड्यातील पतसंस्थांमधील तसेच मल्टिस्टेट बँकमध्ये गैरकारभार झाला असून त्यांना बुडविण्यातही वाल्मिक कराडचा सहभाग असल्याची माहिती धस यांनी पवार यांना दिल्याचे कळते.‘ज्या बँका, पतपेढ्या बुडाल्या त्यामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग आहे. कराडने एका स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेला दमबाजी करून त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांची डिफेंडर गाडी घेतली,’ असा आरोपही धस यांनी यावेळी केला. असे पैसे देण्या-घेण्यात, पैसे बुडविण्याच्या प्रकरणात नागरिकांची बाजू घेण्याऐवजी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघेही पैसे बुडविणाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले. कराड हा चोरांचा, दरोडेखोरांचा साथीदार आहे, असा आरोपही धस यांनी केला.