पिंपरखेड जवळ रात्री तीन वाजेच्या सुमारास चार गावठी पिस्टल व विस जिवंत काडतूस विना परवाना घेऊन येताना मध्यप्रदेश येथील तरुणावर भडगाव पोलीसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत एक लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमालासह आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई भडगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के, पो. कॉ. प्रविण परदेशी,पो. हे. कॉ. निलेश ब्राम्हणकार, पो. कॉ. महेंद्र चव्हान, पो. कॉ. संदीप सोनवणे आदींनी केली.
या बाबत आधिक माहिती अशी की,फिर्यादी -पो. कॉ. प्रवीण परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ८ रोजी रात्री तीन वाजे सुमारास भडगांव ते एरंडोल रोडवर पिंपरखेड गावाच्या अलीकडेस आरोपी – सुनिल बिलदार बारेला (वय ३५) रा. उमरटी. ता. बारला जि . बडवाणी मध्य प्रदेश हा ०४ गावठी बनावटीचे पिस्टल, २० जिवंस काडतुस यामध्ये १)२५,०००/- रु. कि. एक गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) तीस लोखंडी मॅक्झीन असलेली, समोर गोल बॅरल व मुठीच्या दोन्ही बाजुस काळयारंगाची प्लेट २) २५,०००/- रु. कि. एक गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) तीस लोखंडी मॅक्झीन असलेली, समोर गोल बॅरल व मुठीच्या दोन्ही बाजुस काळया रंगाची प्लेट ३) २५,०००/- रु. कि. एक गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) तीस लोखंडी मॅक्झीन असलेली, समोर गोल बॅरल व मुठीच्या दोन्ही बाजुस लाल रंगाची प्लेट तिवर गोलाकार स्टारची नक्षी असलेली ४) २५,०००/- रु. कि. एक गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) तीस लोखंडी मॅक्झीन असलेली, समोर गोल बॅरल व मुठीच्या दोन्ही बाजुस लाल रंगाची प्लेट तिवर गोलाकार स्टारची नक्षी असलेली ५) २०,०००/- रु. कि. गावठी बनावटीची पिस्टलचे २० जिवंत काडतुस ६) ५०,०००/- रु. कि, बजाज प्लॅटीना कंपनीची मो. सा. क्रमांक एम पी ४६ झेड बी ४७६२ जु. वा. ७) ३००/- रु. कि. हिरवट रंगाची बंग तिवर इंग्रजीत बॅग गियर लिहलेले जु. वा. कि. अं. एकूण १,७०,३००/- रु. पये विना परवाना कब्ज्यात बाळगतांना मिळून आला म्हणून भडगांव पोलीस स्टेशन गु. र. न. १०/२०२५ शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के हे करीत आहे.