धरती चंद्रकांत चौधरी हिस विशेष दिक्षांत समारंभात सुवर्णपदक प्राप्त: दुर्दम्य इच्छा शक्तीच्या जोरावर यश साध्य होते: धरती चौधरी . धरती चंद्रकांत चौधरी, भुसावळ, हिला मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MCJ) या विषयात सुवर्णपदक मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! ८ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३३ व्या दीक्षांत समारंभात तिला हे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. समारंभ विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाशय राज्यपाल आणि विद्यापीठाचे सन्मानिय कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी अध्यक्षस्थान भूषवले होते, तर विद्यापीठ अनुदान आयोगाचे सन्मानिय अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांनी दीक्षांत भाषण केले. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.
या समारंभात विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली, ज्यामध्ये कु. धरती सिमा चंद्रकांत चौधरी हिने मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MCJ) या विषयात सुवर्णपदक मिळवून आपली कर्तबगारी सिद्ध केली. सध्या धरती सिमा चंद्रकांत चोधरी पुणे येथे नोकरी करत आहे. तिच्या यशस्वी कारकिर्दी साठी एम सी जे डिपार्टमेंट सर्व प्राध्यापक , नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर ,लोक संघर्ष मोर्चीच्या प्रतिभाताई शिंदे , वर्धा नई तालिमचे सुगंठ बरंठ , महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष रमेश दाणी , महाराष्ट्र राज्य बालकल्याण समितीचे अध्यक्ष आर के जाधव , नशाबंदी मंडळ महराष्ट राज्य सरचिटणीस वर्षा विद्या विलास , मुंबई जेष्ठ पत्रकार अमोल स .मा. मडावी , दी एज्यूकेशन सोसायटी व डी एस देशमुख विद्यालय थोरगव्हाण स्टाफ् ,थोर सक्षम फाउंडेशन, थोरगव्हाण, पंचायत समिती भुसावळ, तसेच विविध सामाजिक व्हाटस अप गृप आणि महाराष्ट्रासह देशभरातून मित्र परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी तिला अनेक शुभेच्छा!
कु धरती चौधरी ही भुसावळ येथिल सामाजिक कार्यकर्ते तसेच दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण अध्यक्ष लोकसेवक चंद्रकांत चौधरी भुसावळ यांची कन्या आहे . वाचन दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवून प्रामाणिक कष्ट मेहनत घेतली तर ध्येयाचे उच्च शिखर गाठता येते असे कु धरती चौधरी हिने मत व्यक्त केले .