धरती चंद्रकांत चौधरी हिस विशेष दिक्षांत समारंभात सुवर्णपदक प्राप्त: दुर्दम्य इच्छा शक्तीच्या जोरावर यश साध्य होते: धरती चौधरी .

धरती चंद्रकांत चौधरी हिस विशेष दिक्षांत समारंभात सुवर्णपदक प्राप्त: दुर्दम्य इच्छा शक्तीच्या जोरावर यश साध्य होते: धरती चौधरी . धरती चंद्रकांत चौधरी, भुसावळ, हिला मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MCJ) या विषयात सुवर्णपदक मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! ८ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३३ व्या दीक्षांत समारंभात तिला हे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. समारंभ विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाशय राज्यपाल आणि विद्यापीठाचे सन्मानिय कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी अध्यक्षस्थान भूषवले होते, तर विद्यापीठ अनुदान आयोगाचे सन्मानिय अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांनी दीक्षांत भाषण केले. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.

या समारंभात विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली, ज्यामध्ये कु. धरती सिमा चंद्रकांत चौधरी हिने मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MCJ) या विषयात सुवर्णपदक मिळवून आपली कर्तबगारी सिद्ध केली. सध्या   धरती सिमा चंद्रकांत चोधरी पुणे येथे नोकरी करत आहे. तिच्या यशस्वी कारकिर्दी साठी एम सी जे डिपार्टमेंट सर्व प्राध्यापक , नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर ,लोक संघर्ष मोर्चीच्या प्रतिभाताई शिंदे , वर्धा नई तालिमचे सुगंठ बरंठ , महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष रमेश दाणी , महाराष्ट्र राज्य बालकल्याण समितीचे अध्यक्ष आर के जाधव , नशाबंदी मंडळ महराष्ट राज्य सरचिटणीस वर्षा विद्या विलास , मुंबई जेष्ठ पत्रकार अमोल स .मा. मडावी , दी एज्यूकेशन सोसायटी व डी एस देशमुख विद्यालय थोरगव्हाण स्टाफ् ,थोर सक्षम फाउंडेशन, थोरगव्हाण, पंचायत समिती भुसावळ, तसेच विविध सामाजिक व्हाटस अप गृप आणि महाराष्ट्रासह देशभरातून मित्र परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी तिला अनेक शुभेच्छा!
कु धरती चौधरी ही भुसावळ येथिल सामाजिक कार्यकर्ते तसेच दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण अध्यक्ष लोकसेवक चंद्रकांत चौधरी भुसावळ यांची कन्या आहे . वाचन दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवून प्रामाणिक कष्ट मेहनत घेतली तर ध्येयाचे उच्च शिखर गाठता येते असे कु धरती चौधरी हिने मत व्यक्त केले .

  • Related Posts

    खेळता खेळता अनर्थ घडला, मित्रांची मस्ती चिमुकलीच्या जीवावर बेतली, तरुण अंगावर पडल्यानं २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू,

     जुहूत दोन वर्षाच्या चिमुकलीवर एक विद्यार्थी त्याचा तोल गेल्याने पडला. मात्र यात चिमुकली गंभीर जखमी झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.जुहूमधून अतिशय हैराण करणारी बातमी समोर आली आहे. कॉलेजमध्ये शिकणारा…

    दुचाकीवर रॉडने मारहाण, भररस्त्यात सव्वा कोटींची रक्कम लुटली; हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी

     वाशिममध्ये भररस्त्यात दुचाकीवरुन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करत त्यांच्याकडीव सव्वा कोटींची रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाऱ्या दोन कामगारांवर चोरट्यांकडून हल्ला करण्यात आला आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    खेळता खेळता अनर्थ घडला, मित्रांची मस्ती चिमुकलीच्या जीवावर बेतली, तरुण अंगावर पडल्यानं २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू,

    खेळता खेळता अनर्थ घडला, मित्रांची मस्ती चिमुकलीच्या जीवावर बेतली, तरुण अंगावर पडल्यानं २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू,

    दुचाकीवर रॉडने मारहाण, भररस्त्यात सव्वा कोटींची रक्कम लुटली; हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी

    दुचाकीवर रॉडने मारहाण, भररस्त्यात सव्वा कोटींची रक्कम लुटली; हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी

    बायकोचं मृत्यू प्रमाणपत्र काढायला गेला; सचिवाला लाच देण्यास नकार, पतीसोबत भयंकर प्रकार

    बायकोचं मृत्यू प्रमाणपत्र काढायला गेला; सचिवाला लाच देण्यास नकार, पतीसोबत भयंकर प्रकार

    भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक युवा मोर्चा व अशफाक फाउंडेशन तर्फे प्रथम मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांची जयंती साजरी केली.

    भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक युवा मोर्चा व अशफाक फाउंडेशन तर्फे प्रथम मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांची जयंती साजरी केली.

    मुन्नीबद्दल आमदार सुरेश धस यांचा परत मोठा खुलासा, म्हणाले, ती महिला…

    मुन्नीबद्दल आमदार सुरेश धस यांचा परत मोठा खुलासा, म्हणाले, ती महिला…

    तुम्हाला काय एक फोन कॉल आणि प्रॉब्लेम सॉल ना, आमच एक फाईट वातावरण टाईट, निलेश राणे यांच्या भाषणाची चर्चा.

    तुम्हाला काय एक फोन कॉल आणि प्रॉब्लेम सॉल ना, आमच एक फाईट वातावरण टाईट, निलेश राणे यांच्या भाषणाची चर्चा.