बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण तापले आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात होत असलेल्या आरोपांमुळे राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे पत्रकार परिषद घेत पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. बीडमध्ये काही दिवसांपूर्वीच आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी ही केली जातंय. बीडचे वातावरण तापले आहे. आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना टार्गेट करत आहेत. मोर्चामध्ये ते धनंजय मुंडे यांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. आता सुरेश धस यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय. थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले.
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. ते भाजपा आमदार सुरेश धस यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. युतीधर्म सुरेश धस पाळत नाहीत, असे माजी आमदार संजय दौंड यांनी म्हटले. अंबाजोगाईमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली.संजय दौंड हे म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना आता प्रत्येकाचे कॅरेक्टर सर्टिफिकेट तपासले जाणार आहे. त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. 26 जानेवारी रोजी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची पुर्ण कार्यकारणी बरखास्त करणार आहोत. त्याबरोबर ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, अशा एकाही व्यक्तीला पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. सर्वकाही तपासले जाणार. यासोबत आम्ही सुरेश धस यांची तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे भेटून करणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.भाजपाचे आमदार असून ते राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोप वाल्मिक कराडवर करण्यात आले. हेच नाहीतर मुख्य आरोपीलाही पोलिसांनी अटक केली असून तो पोलिस कोठडीत आहे. वाल्मिक कराडच्या पत्नीची चाैकशी सीआयडीकडून करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी अगोदरच स्पष्ट केले की, आरोपींची मदत करणाऱ्यांना कडक शिक्षा केली जाणार आहे.