वरणगाव येथे पशुप्रदर्शन व प्रचार कार्यक्रमाचे आयोजन संपन्न: सुयोग चौधरी यांचे देशीगायीचा प्रथम क्रमांक . शेती क्षेत्राला पुरक व्यवसाय म्हणून पशुसंवर्धन याकडे मोठ्या आशेने पाहिले जाते . त्यासाठी शासनाकडून पशुधन वाढीसाठी भरीव प्रयत्न केले जातात . – नुकतीच पशुगणना , पशुंसाठी लसीकरण आहार दुग्ध उत्पादन वाढीसाठीचे प्रयत्न यासारखाच दुसरा प्रयत्न भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे पशुसंवर्धन विभाग व पंचायत समिती भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय पशुप्रदर्शन व प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रम मंगळवार, दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता पिंपळमळा ऑ . फॅक्टरी रोड, वरणगाव येथे पार पडला .
या प्रदर्शनात विविध जातींच्या उत्कृष्ट गायी, म्हशी व इतर पशुधनाचा समावेश दिसून आला. या कार्यक्रमात पशुधनाच्या आरोग्यविषयक माहिती, सल्ला व प्रोत्साहनपर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या . तसेच पशुपालकांनी आपल्या जनावरांची नोंद प्रदर्शनासाठी सकाळी 7 ते 9 दरम्यान केली . परीक्षकांकडून जातीवंत सुदृढ व वैविध्य गुण असलेल्या जनावरांची पाहाणी केली व निकाल घोषित केले . देशी गाय गटात प्रथम क्रमांक सुयोग उमाकांत चौधरी यांचे गायीला प्राप्त झाला . जिल्हा पशुचिकित्सक यांचे कडून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले . गायी , वासरू , म्हशी या भव्य मेळाव्यात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आणल्या शेतकरी विशेषतःहा हौशी शेतकायांसाठी हा मेळावा महत्वपूर्ण ठरला .