राहुल गांधी यांच्या हिंदू धर्मियांविषयीच्या वक्तव्यावर हिंदू जनजागृती समितीची राष्ट्रपतींकडे कारवाईची मागणी !

(जिल्हा) – हिंदू जनजागृती समितीने . जळगाव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना एक निवेदन देऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हिंदू समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व श्री माधव सेवलानी , आशिष गांगवे , राहुल ओतारी , भूषण पाटील , भिकन मराठे , आकाश चव्हाण , किशोर भालेराव , मयुर भदाणे व उमेश जोशी उपस्थित होते हे लोक उपस्थित होते.

राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे हिंदू जनजागृती समितीने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तत्काळ रद्द करण्याची मागणी केली असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने यापूर्वीही भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवादाची संकल्पना समाजात रुढ करून हिंदू समाजाची नाहक बदनामी केली होती.









