पुण्याहून महाडला जाणारी वऱ्हाडी बस ताम्हिणी घाटात अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 35 जण जखमी झाले आहेत. बस पलटी होऊन रस्त्याच्या कडेला पडली. लग्नासाठी निघालेल्या या बसचा भीषण अपघात झाला. माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे. पुण्यातून एक हैराण करणारी घटना पुढे येतंय. वऱ्हाडी बसचा मोठा अपघात झालाय. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मूत्यू झाला असून 27 जण जखमी आहेत. पुण्याहून महाडला जाणाऱ्या या बसचा ताम्हिणी घाटात अपघात झाला. ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ हा भीषण अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. आज (20 डिसेंबर) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुणे दिघी महामार्गावर ताम्हिणी घाटात असणाऱ्या मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत अपघात झाला. अपघातामध्ये बस पलटी झालीये.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यातून महाड येथील बिरवाडीकडे लग्नासाठी निघालेली खाजगी बस क्र. एम एच 14 जी यु 3405 ही पुण्याहून माणगांवकडे येत असताना ताम्हिणी घाटात अवघड वळणावर आल्यानंतर रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. हा अपघात इतका जास्त भंयकर होता की, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच माणगांव पोलीस तातडीने घटनास्थळ गाठले. या घटनेमुळे एक खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताम्हिणी घाटात हा बस अपघात सकाळी दहाच्या आसपास झालाय. माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ताम्हीणी घाटात purple ट्रॅव्हल्सची खाजगी बस पलटी होऊन अपघात झाला आहे. जाधव कुटुंबीय लोहगाव पुणे येथून बिरवाडी महाड येथे लग्न समारंभास जात होते. यादरम्यान ताम्हीणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर बस पलटी झाली आहे. यामध्ये दोन पुरुष व 3 महिला अशा एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 27 जखमी लोकांना बाहेर काढून माणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी काम करत आहेत. मयताची नावे पुढीलप्रमाणे संगीता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदिप पवार, वंदना जाधव आणि अनोळखी पुरुष अजुन नांव निश्चित नाही, अशी माहिती सोमनाथ घरगे, पोलिस अधीक्षक रायगड यांनी दिली आहे.