तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला

 तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला

अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या महसूल पथकावर 12 ते 15 वाळू माफियांनी अचानक हल्ला केल्याची खळबळजनक घटना मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चांदसर बु.गावातील गिरणा नदी पात्रात घडली आहे. हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने तलाठी दत्तात्रय पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली. तर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर महसूल पथकातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट दिसेल तिकडे पळत सुटले. 18 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री 2:15 धरणगाव येथील तहसील कार्यालयातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकाने चांदसर बु ता धरणगाव येथिल गिरणा नदी पात्रात वाळू वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर नायब तहसिलदार महसूल संदीप मोरे, मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत बाविस्कर, मंडळ अधिकारी प्रवीण बेंडाळे, तलाठी दत्तात्रय पाटील यांनी पकडले. घटनेची माहिती मिळताच ट्रॅक्टर चालक,मालक व वाळू भरणारे मजूर असे एकूण 12 ते 15 लोकांनी महसूलच्या पथकावर हल्ला चढवला.

अचानक हल्ला झाल्याने महसूलच्या अधिकाऱ्यांसह पथकातील सदस्यांनी जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट दिसेल तिकडे धाव घेतली. यावेळी तलाठी दत्तात्रय पाटील हे हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने त्यांनापावड्याने,लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. तलाठी दत्तात्रय पाटील यांच्या पायावर जाणीवपूर्वक फावडे मारून पायाचे हाड मोडल्याने त्यांना जळगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कंडारे हे घटनास्थळी पोहचले. दरम्यान, वाळू माफियांनी महसूल पथकावर केलेल्या हल्ल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे. चांदसर बु. (ता. धरणगाव) येथील गिरणा नदीपात्रात मध्यरात्री महसूल पथकावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेने महसूल विभाग आणि परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्यात तलाठी दत्तात्रय पाटील गंभीर जखमी झाले असून, त्यांना जळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 18 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री 2.15 वाजता धरणगाव तहसील कार्यालयातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकाने चांदसर बु. येथील गिरणा नदीपात्रात वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले होते. या पथकामध्ये नायब तहसीलदारसंदीप मोरे, मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत बाविस्कर, मंडळ अधिकारी प्रवीण बेंडाळे, आणि तलाठी दत्तात्रय पाटील सहभागी होते.घटनेची माहिती मिळताच ट्रॅक्टर चालक, मालक आणि वाळू भरणारे मजूर असे 12 ते 15 जणांनी महसूल पथकावर अचानक हल्ला केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे महसूल पथकातील अधिकारी व कर्मचारी जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात पळत सुटले. मात्र तलाठी दत्तात्रय पाटील हल्लेखोरांच्या तावडीत अडकले. तलाठ्याला फावड्याने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यांचे पायाचे हाड फावड्याने मारून जाणीवपूर्वक मोडण्यात आले. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कंडारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. महसूल पथकावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ माजली असून, प्रशासनाने हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी महसूल विभागाने रात्रगस्त सुरू केली आहे. मात्र, वाळू माफियांकडून महसूल पथकांवर होत असलेल्या अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.