मद्यपान करून बस चालवणारा चालक निलंबित

मद्यपान करून बस चालवणारा चालक निलंबित

जळगाव जिल्ह्यात काही दिवसात बसचे दोन तीन वेळेस अपघात झाले आहेत. त्यातच अनेकदा चालक मद्य प्राशन करून बस चालवतात. जळगाव एसटी डेपो मधील बाभूळगाव मुक्कामाला जाणाऱ्या बसचे चालक मद्यधुंद असल्याने नागरिकांनी वेळीच बस थांबून चालकाची विभाग नियंत्रकाकडे तक्रार केली.त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुसऱ्या चालकाची व्यवस्था करून बस मार्गी लावली. याबाबत संबंधित बस चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव डेपोची बस क्रमांक (एम. एच. १४ बी टी २३०४) ही बस बाभूळगाव या गावाला रात्री मुक्कामी जाते. नेहमीप्रमाणे दि. १६ रोजी रात्री बस आपल्या मुक्काम स्थानी निघाली असता पाळधीचा पुल पार केल्यानंतर बसलेल्या प्रवाशांच्या लक्षात आले की, बस चालक हा मदयधुंद अवस्थेत आहे. त्यामुळे बसमधील प्रवाशांनी एका हॉटेलजवळ बस थांबवली व कंडक्टरला याबाबत सांगितले. याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना मिळताच त्यांनी रात्री खाजगी वाहनाने त्या ठिकाणी जाऊन प्रवाशांशी चर्चा केली. संबंधित मदयधुंद वाहनचालक आनंद माळी याच्या जागी दुसऱ्या वाहन चालकाची व्यवस्था करून बस मार्गस्थ केली. याबाबत विभाग नियंत्रक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, चालक आनंद माळी याचे मेडिकल केल्यानंतर त्याने मद्यसेवन केल्याचे आढळूनआले. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे व यापुढे असा प्रकार होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.