थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनला अटक.

साऊथ इडंस्ट्रीतून मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. ‘पुष्पा २’च्या प्रीमिअर शोदरम्यान हैदराबादमधील एका चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत दोन जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढल्या आहेत. अल्लू अर्जुनला अटक झाल्याची माहिती आहे.  आरटीसी एक्स रोडवरील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत दोन चाहत्यांचा मत्यू झाल्यानंतर अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती आहे. पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ आणि ११८(१) अंतर्गत अभिनेता अल्लू अर्जुन, त्याचं सुरक्षा पथक आणि चित्रपटगृह व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंदवला .होता. चित्रपटगृह व्यवस्थापनाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती, असं पोलिसांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी थिएरट मालकांपैकी एक , तसंच वरिष्ठ व्यवस्थापक आणि एक कर्मचारी अशा आणखी तीन जणांना अटक केली आहे. 

दरम्यान, अल्लू अर्जुनकडून एफआयर रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तसंच याचिका निकाली निघेपर्यंत अटकेसह इतर कारवाईला स्थगिती देण्याची विनंतीही त्यानं केली होती. आरटीसी एक्स रोडवरील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियर शोसाठी आलेल्या अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीत श्वास कोंडल्यानं ३५ वर्षीय रेवती या महिलेचा मृत्यू झाला होता. तर, तिचा मुलगा श्रीतेज याचाही श्वास गुदमरल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ४८ तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं.पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ आणि ११८(१) अंतर्गत अभिनेता अल्लू अर्जुन, त्याचे सुरक्षा पथक आणि चित्रपटगृह व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर अल्लू अर्जुननं एक व्हिडिओ शेअर करत दु:ख व्यक्त केलं होतं. तसंच त्यानं मृतांच्या नातेवाईकांसाठी २५ लाखांच्या मदतीची घोषणानाही केली होती.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.