शरद पवारांना मोठा धक्का, निवडणुकीनंतर ‘तो’ बडा नेता अजित पवार गटात प्रवेश करणार

शरद पवारांना मोठा धक्का, निवडणुकीनंतर ‘तो’ बडा नेता अजित पवार गटात प्रवेश करणार

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षालाही अपेक्षित यश मिळालं नाही. शरद पवार गटाचे केवळ 10 आमदार निवडून आले. असं असताना निवडून झाल्यानंतर खान्देशातील बडा नेता आता शरद पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. जळगावातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. जवळपास 5 हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे गुलाबराव देवकर यांच्यासोबत अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटात जाणार असल्याचं गुलाबराव देवकर यांनी सर्वात आधी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं आहे. माजी मंत्री, जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देवकर यांनी भेट घेतली. सोमवारी ते अजित पवार यांची भेट घेणार आहेत. अजित पवार यांच्या भेटीनंतर प्रवेश सोहळा कधी आणि कुठे घ्यायचा याबद्दलचा निर्णय होईल, अशी माहिती गुलाबराव देवकर यांनी दिली आहे.

चिंतन बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी सत्तेत जायला हवं असं सांगितलं होतं. अजित पवार गटात जाण्याबद्दल निर्णय घेतला होता. कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार अजित पवार गटात प्रवेश करत आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघातले तसेच जिल्ह्यातले अनेक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, असं गुलाबराव देवकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं. विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का पचवत नाही, तोच जळगाव जिल्ह्यात गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते अजित पवार गटात जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तर आगामी दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानिवडणुकांमध्ये जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठं बळ यानिमित्ताने मिळणार आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.