पत्नीला मारून चकवा देणारा पती अखेर पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : झोपेतील पत्नीवर चाकूने डोक्यात व हातापायावर वार करून पतीने गंभीररीत्या जखमी केले. ही घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित पती वेगवेगळे ठिकाण बदलवून पोलिसांना चकवा देत होता.गोपनीय माहितीवरून शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) संशयित पती समाधान सपकाळे याला मुसळी फाट्याजवळ एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले.

जखमी महिलेवस ९२ टाके पडले होते. याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित पोलीस पतीच्या वाईट वागणुकीला कंटाळून मुलासह पत्नी विभक्त राहत होती. सोबत घरी चल असा पतीचा हट्ट होता. तसेच तो भांडत होता. ७ नोव्हेंबर रोजी पत्नी झोपली होती. पती समाधान सपकाळे पुन्हा घरी आला व पत्नीशी वाद घातला. मी तुझ्याकडे येणार नाही, मुलेही तुला देणार नाही, असे पत्नीने त्याला बजावले. यामुळे रागातून पती समाधान याने घरात पडलेला चाकू उचलत पत्नीच्या डोक्यावर, हातापायांवर सपासप वार करून जखमी केले. मोठा मुलगा हे भांडण सोडविण्यास गेला असता मुलालाही समाधान याने मारहाण करून पत्नी मृत झाल्याचे समजून खेडी येथून पळाला होता.गल्लीतील लोकांनी जखमी महिलेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. महिलेवर उपचारात ९२ टाके टाकण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. मात्र संशयित पती हा सतत राहण्याची जागा बदल करत असल्याने त्याचा ठाव पोलिसांना लागत नव्हता. संशयित समाधान हा एरंडोलमार्गे मुंबईकडे पळून जात आहे, अशी गोपनीय माहिती शुक्रवारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार उपनिरीक्षक शरद बागल यांनी संशयिताचा मोबाइल क्रमांक प्राप्त करून त्याचे लोकेशन काढले असता, तो एरंडोलच्या दिशेत असल्याचे कळाले. त्यानुसार योगेश बारी, किशोर पाटील, छगन तायडे, किरण पाटील, नितीन ठाकूर यांचे पथक रवाना झाले. एकलग्न येथे सापळा रचून पथकाने रस्त्यावर दुचाकींची झडती घेतली. समोरून समाधान सपकाळे हा येताना दिसताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. याकामी पोलीस अधीक्षक कार्यालयातील गौरव पाटील, मिलिंद जाधव यांची वेळोवेळी तपास पथकाला मोबाइल व तांत्रिक विश्लेषणकामी मदत झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित तपास करीत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.