चिठ्ठी लिहून शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल. पतीला समोर पाहताच हंबरडा फोडला.

जळगावात एका तरुण शिक्षकाने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकाने चिठ्ठी लिहूजळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी जिल्ह्यात एका खाजगी शिक्षकाने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकाने आत्महत्येचं कारणही सांगितलं असून सुसाईड नोटही लिहिली आहे. न टोकाचं पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंपजवळ राहणाऱ्या एका खासगी शिक्षकाने राहत्या घरात सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना गुरुवार २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहुल आंबादास पाटील, वय ३५ रा. बोरखेडा ता. धरणगाव ह. मु. गुजराल पेट्रोलपंप, जळगाव असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील रहिवासी राहुल आंबादास पाटील हे आपल्या पत्नी आणि आई यांच्यासोबत जळगावातील गुजराल पेट्रोल पंपाजवळ वास्तव्याला होते. ते शहरातील खासगी क्लासेसमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पोटाचा गंभीर आजार असल्याचं समजलं होतं. त्यांच्यावर उपचारदेखील सुरू होते.पोटाच्या आजारामुळे त्यांच्यावर पोटाची दोन वेळा शास्त्रक्रिया देखील झाली होती. दरम्यान, पोटाच्या आजारालाच्या सततच्या त्रासाला कंटाळून आपण गळफास घेत असून यात कुणालाही दोषी ठरवू नये, अशी सुसाईड नोट लिहून त्यांनी गुरूवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घरात कुणीही नसताना आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

राहुल पाटील यांची पत्नी बाहेर गेली असताना राहुल यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. पत्नी घरात आल्यानंतर तिने पतीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं पतीला पाहताच तिने हंबरडा फोडला. तात्काळ राहुल यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.