संशयाचं भूत डोक्यात शिरलं, कुऱ्हाडीने पत्नीसह पोटच्या पोरांना सपवलं, पण…भयानक घटनेने शहर हादरलं

संशयाचं भूत डोक्यात शिरलं, कुऱ्हाडीने पत्नीसह पोटच्या पोरांना सपवलं, पण…भयानक घटनेने शहर हादरलं

जळगाव : जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका नवऱ्याने आपल्या पत्नीसह दोन चिमुकल्यावर कुऱ्हाडीने वार करुन हल्ला केल्याची घटना घडली आहे.या घटनेत दोन्ही चिमुकल्यांनी जागीच मृत्यू झाला आहे, तर पत्नी या हल्ल्यातून थोडक्यात बचावली आहे. या घटनेने सध्या शहर हादरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी संजय पावरा यांचे काही वर्षापुर्वीच लग्न झाले होते. दोघांचे अगदी कमी वयात लग्न झाले होते. संजय याच्या पत्नीला वयाच्या 18 वर्षाआधी दोन चिमुकली मुलं झाली होती.दोघांचाही सुखी संसार सूरू असतानाच अचानक संजयने पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घ्यायला सुरूवात केली होती. या संशयातून आता भयानक हत्याकांड घडल्याची घटना घडली आहे.

संजय सतत चारीत्र्यावर संशय घेत असल्याने घटनेच्या दिवशी पती पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. याच भांडणातून संजयने संतापाच्या भरात दोन चिमुकल्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांना जागीच ठार केले.त्यानंतर पत्नीच्या डोक्यावरही कुऱ्हाडीने पाच ते सहा वार करुन तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र ही घटना शेजाऱ्यांना कळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.तसेच आरोपीच्या पत्नीला रुग्णालयात दाखल केले. पण पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केल्याने तिच्या मेंदुला जबर मार बसला आहे. तिच्यावर सध्या धुळे येथील शासकीय रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.ही घटना मध्य प्रदेशच्या सीमेवरील देवळी गावी घडली. या प्रकरणी आता शेजाऱ्यांनी संजय पावरा यालापोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी मध्य प्रदेशातील वरला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.तसेच या घटनेचा अधिक तपास सूरू आहे. या घटनेने जळगाव जिल्हा हादरला आहे.

  • Related Posts

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला जळगाव | भुसावळ येथील सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात लोखंडाची खिडकी तोडून 33 तोळ्याचे…

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा जळगाव : सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून शेततळ्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कंत्राटदाराची तापी पाटबंधारे विभागाचे तत्कालिन वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न