जळगावात किमान तापमानात घट; थंडीचा गारठा वाढला

जळगावात किमान तापमानात घट; थंडीचा गारठा वाढला

उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा वाढला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातही सोमवारी किमान तापमानात एक अंशाने घट झाली असून यामुळे गारठा वाढला आहे.पुढील काही दिवस जळगावसह राज्यात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जळगावात सोमवारी किमान तापमान १२ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद झाली आहे. कमाल तापमान ३० अंशांवर होते. २८ नोव्हेंबरपर्यंत जळगावकरांना सकाळी व रात्री गारठा जाणवणार आहे. २९ नोव्हेंबरनंतर थंडीचा जोर कमी होणार आहे. कमाल तापमान या काळात वाढण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवलेली आहेराज्यात कसं असेल आजचे हवामान?

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये हुडहुडी वाढत जाण्याच अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढू लागला आहे.काल उत्तर प्रदेशातील ‘सारसवा’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये राज्याचे यंदाच्या हंगामातील ९.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १० अंश तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी किमान तापमान १३ अंशांपेक्षा खाली आहे. उर्वरीत राज्यात किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे. मंगळवार दि. २६ नोव्हेंबरनंतर म्हणजे थंडीतील सातत्य हे टिकून असण्याची शक्यता ही आहेच, परंतु त्या संदर्भातील खुलासा त्यावेळच्या वातावरणीय अवस्थेनुसारच केलेले योग्य ठरेल, असे वाटते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.