डायल ११२ वर कॉल करुन दिली खोटी माहिती

डायल ११२ वर कॉल करुन दिली खोटी माहिती

पाचोरा पोलीस स्टेशनला २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजुन २५ मिनिटांनी डायल ११२ वर अज्ञात इसमाने मोबाईलवरुन फोन करुन माहिती दिली की, पाचोरा शहरातील जारगाव चौफुली वर १५० ते २०० लोक विशीष्ट समाजाच्या लोकांना मारहाण करीत आहे.त्यापैकी २ लोकांचा मर्डर झालेला आहे. त्यात चॉपर सारख्या हत्याराचा वापर करण्यात आलेला आहे. तात्काळ पोलीस पाठवा बाबत फोन आलेला होता.

सदर माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचा स्टाफ रात्री उशिरा पर्यंत निवडणुकीचा महत्वाचा बंदोबस्त करुन सकाळी पुन्हा कर्तव्यावर हजर होताच आलेल्या कॉलचे गांभीर्य ओळखुन पाचोरा पोलीस ठाणे कडील पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी जावुन मिळालेल्या माहिती प्रमाणे सखोल चौकशी करता फोन केल्याप्रमाणे सदर ठिकाणी कोणतीही घटना घडलेली नव्हती. फोन केलेल्या इसमाचा मोबाईल नंबर वरुन शोध घेतला असता शैलेश रविंन्द्र पाटील रा. तामसवाडी ता. पारोळा जि. जळगाव हल्ली मुक्काम रा. जारगाव चौफुली, पाचोरा हा मिळून आला.दरम्यान त्यास घटनेबाबत विचारपुस करता त्याने कळवले की, मी मुददामहून पोलीस स्टेशनला फोन केलेला होता. तशी काही एक घटना घडलेली नाही. शैलेश रविंन्द्र पाटील रा. तामसवाडी ता. पारोळा जि. जळगाव याने नागरीकांना व पोलीसांना त्रास व्हावा या हेतुने मुददामहून पोलीसांना डायल ११२ वर कॉल करुन खोटी माहिती दिल्याने शैलेश पाटील याचे विरुध्द २४ नोव्हेंबर रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील हे करीत आहे. नागरीकांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र पोलीस दलातर्फे डायल ११२ ही सुविधा महिला, मुली व जेष्ठ नागरीकांकरीता गंभिर प्रसंगी तात्काळ मदत उपलब्ध होण्याकरीता सुरु करण्यात आलेली आहे. तरी नागरीकांनी डायल ११२ वर गंभिर प्रसंगीच पोलीस मदतीकरीता कॉल करावा. असे आवाहन पोलीसांकडुन करण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.