चंदगडमध्ये नवनिर्वाचित आमदाराचे औक्षण करताना जेसीबीतून झालेल्या गुलालाच्या उधळणीमुळे आगीचा भडका; आमदारासह‌ काही महिला जखमी

चंदगडमध्ये नवनिर्वाचित आमदाराचे औक्षण करताना जेसीबीतून झालेल्या गुलालाच्या उधळणीमुळे आगीचा भडका; आमदारासह‌ काही महिला जखमी

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपतून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांच्या विजयानंतर जेसीबीमधून गुलालाची उधळण करण्यात आली. त्याचवेळी नवनिर्वाचित आमदाराचे औक्षण करण्यात येत होते.जेसीबीतील गुलालाची उधळण ओक्षणाच्या ताटावर झाल्याने आगीचा भडका उडाला. या घटनेत आमदारांसह काही महिला जखमी झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी 8.30 ते 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने ही घटना उघडकीस आली आहे.

अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील आमदार झाल्याने त्यांच्या विजयाप्रत्यर्थ वाटेत महिला औक्षण करण्यासाठी थांबल्या होत्या. यावेळी शिवाजी पाटील हे गाडीतून उतरले असता त्यांना महिलांकडून औक्षण सुरू असतानाच याचवेळी जेसीबीमधून त्यांच्यावर गुलालाची उधळण करण्यात आली. गुलालामध्ये असलेल्या रासायनिक घटकांचा औक्षण करताना आगीशी संपर्क झाल्याने, हा आगीचा भडका उडाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांच्यासह काही महिला जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.