भाजपचे संकटमोचक सातव्यांदा विजयी; जामनेरमध्ये दिलीप खोडपे यांचा पराभव

भाजपचे संकटमोचक सातव्यांदा विजयी; जामनेरमध्ये दिलीप खोडपे यांचा पराभव

जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघात भाजपच्या गिरीश महाजन यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दिलीप खोडपे यांचा पराभव झाला केला आहे.जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन व कधी काळी भाजपचे पदाधिकारी राहिलेले दिलीप खोडपे यांच्यात लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने खोडपे यांना उमेदवारी दिली होती. गिरीश महाजन हे आतापर्यंत सलग सहावेळा विजयी झाले आहेत. आता सातव्यांदा त्यांनी बाजी मारली आहे.

आठव्या फेरीनंतर महाजन यांनी ९५११ मतांनी आघाडी घेतली महाजन यांना ४२५९४ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेदिलीप खोडपे यांना ३३०८३ मते मिळाली आहेत. मतमोजणी सुरु आहे.भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी काही दिवसापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. दिलीप खोडपे यांची जळगाव जिल्ह्यात मराठा नेता म्हणून ओळख आहे. एकट्या जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल 1 लाख 40 हजार मतदान आहे. त्यामुळे दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या समोर तगडे आव्हान देतील शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे म्हणणे होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांना 1,13,765 तर संजय गरुड यांना 79,022 मतं पडली होती.जामनेर मतदारसंघात ३ लाख १८ हजार ३६६ एवढे मतदार आहेत. मराठा कुणबी समाजाचे एकूण १ लाख ४० हजार ते १ लाख ५० हजार एवढे मतदार आहेत ( एकूण मतदानाच्या ४५ ते ५० टक्के)धनगर समाजाचे २० हजार मतदार आहेत (एकूण मतदानाच्या ७ टक्के), बंजारा समाज २५ हजार (७ टक्के), मंत्री गिरीश महाजन ज्या समाजातून आहेत त्या गुजर समाजाचे १८ ते २० हजार मतदार आहेत (७ टक्के), मुस्लिम समाजाचे ५० हजार (१६ टक्के), इतर समाजाचे ४० ते ४५ हजार (३ टक्के)अशा पद्धतीने जामनेर विधानसभा निवडणुकीत मराठा आणि कुणबी समाजाची ४५ ते ५० टक्के मतदार असून ते निर्णायक मतदार आहेत.जामनेर विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे संजय गरुड यांच्यात मुख्य लढत झाली होती. संजय गरुड हे मराठा चेहरा म्हणून गिरीश महाजन यांच्या विरोधात मैदानात उतरले. या निवडणुकीत गिरीश महाजन यांना १ लाख १४ हजार ७१४ एवढे मतं पडली होती. यात एकूण मतदानाच्या ५४.९५ टक्के मते गिरीश महाजन यांना मिळाली होती.

या निवडणुकीत ३५ हजार १४ एवढ्या मतांनी गिरीश महाजन यांनी संजय गरुड यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांना मिळालेल्या मतांपैकी समाजनिहाय मतदानाचा विचार केल्यास, मराठा आणि कुणबी समाजाचे ४० ते ५० मतदान झाले होते. तर मुस्लिम आणि इतर समाजाचे ७० ते ८० टक्के मतदान होते. गिरीश महाजन यांचे विरोधक असलेले संजय गरुड हे आता भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे सध्या तरी गिरीश महाजन यांच्यासमोर प्रबळ आणि सक्षम उमेदवार नव्हता.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.