चार जणांच्या टोळक्याने दोघा मित्रांना केली बेदम मारहाण.गुन्हा दाखल

चार जणांच्या टोळक्याने दोघा मित्रांना केली बेदम मारहाण.गुन्हा दाखल

विधान सभा निवडणुकीत उमेदवाराचे पैसे वाटत असल्याच्या संशयितांनी चार जणांच्या टोळक्याने दोघा मित्रांना बेदम मारहाण केल्याची घटना मधुबन कॉलनीत घडली. या घटनेत काही तरी वजनी वस्तू डोक्यात मारण्यात आल्याने तक्रारदार युवक जखमी झाला आहे.याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. मुकूंद सुदाम कासार (२४ रा.के.के.वाघ मागे अपोलो हॉस्पिटल जवळ) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. कासार व अभिजीत पांगरे हे दोघे मित्र मंगळवारी (दि.१९) रात्री मधुबन कॉलनी भागात राहणा-या सुनिल रोकडे या मित्रास भेटण्यासाठी दुचाकीवर आले असता ही घटना घडली.

अमृतगार्डन भागातून दोघे दुचाकीवर जात असतांना गायकवाड नामक इसम, एक महिला व अन्य दोन जणांच्या टोळक्याने त्यांची वाट अडविली. उमेदवाराचे पैसे वाटप करीत आहेत का अशी विचारणा करीत टोळक्याने दोघा मित्रांना शिवागाळ करीत बेदम मारहाण केली. या घटनेत एकाने वजनी वस्तू डोक्यात मारल्याने तक्रारदार कासार जखमी झाले असून अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.