आणखी ५ वर्षे तडजोड नको, विकासाची दिशा ठरवा..! डॉ. अनुज पाटलांना मतदान करा अयोध्या नगर येथील रहिवासीअविनाश पाटील यांचे आवाहन
जळगाव – अयोध्या नगरमधील त्रासलेल्या नागरिकांनी आता ठरवले मतदान फक्त डॉ.अनुज पाटील यांनाच करणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे. गेल्या २० वर्षांपासून अयोध्या नगर परिसरातील रहिवासी एकाच समस्येला तोंड देत आहोत – खराब रस्ते, नागरी सोयींची कमतरता, आणि मूलभूत सुविधांची उदासीनता. परिसरातील नागरिकांनी वेगवेगळ्या पक्षांना आणि उमेदवारांना संधी दिली, पण परिस्थिती जसाची तशीच आहे. म्हणून या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या रूपाने एक सुशिक्षित उमेदवार जळगाव शहराला मिळाल्यामुळे त्यांना अयोध्या नगर परिसरातील जागरूक नागरिक त्यांना संधी देणार असल्याचे अविनाश पाटील यांनी सांगितले.
मात्र यंदा परिस्थिती बदलण्याची ताकद आपल्या हातात आहे.रस्त्यांची सुधारणा, नागरी सोयीसुविधा, आणि आपल्या सर्वांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचं वचन डॉ. अनुज पाटील यांनी आयोध्या नगर येथील रहिवाशांना दिले आहे यांना दिले आहेत दिलं आहे. अयोध्या नगरातील नागरिकांनी आता ठरवले आहे की, यंदा संधी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच द्यायची. डॉ. अनुज पाटील यांच्या नेतृत्वात आपण आपल्या नगराचं भवितव्य बदलू शकतो.
यंदाच्या निवडणुकीत एका ठोस बदलासाठी, एका नव्या दिशेसाठी मतदान करा. डॉ. अनुज पाटील यांना निवडून देऊन, आपण आपल्या नगरासाठी विकासाची नवी संधी निर्माण करूया असेही अविनाश पाटील यांनी म्हटले आहे.