सावदा पोलीस ठाणे तर्फे सर्व नागरिकांना जाहीर आवहान.
सावदा पोलीस यांच्या तर्फे सर्व नागरीकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, विविध कारणावरून सध्याच्या काळात दोन समाज, दोन धर्म, दोन जात, तसेच जातीय /धार्मिक/ राजकीय/ भावनिक तेढ निर्माण करण्याचे अनुषंगाने समाजमाध्यमांवर काही व्हीडीओ, मजकुर असे प्रसारीत होत आहे. त्या अनुषंगाने आपण आपल्या समाजमाध्यमावंर कुठल्याही जातीचा ,धर्माचा पंथाचा अवमान होणार नाही अथवा राजकीय भेद निर्माण होवून आपापसात वाद होणार निर्माण होणार नाही याची खबरदारी घेऊन कुणीही समाजमाध्यमांवर व्हिडीओ, मजकुर प्रसारीत करु नये शांतता राखावी. आपल्याला आलेले व्हिडीओ किंवा मॅसेज खात्री केल्याशिवाय प्रसारीत , फॉरवर्ड करु नये.
सोशल मीडियावरील एखाद्या पोस्टमुळे किंवा व्हिडीओद्वारे काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित सोशल मीडिया ग्रुप ॲडमिन व संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. असे सावदा पो. स्टे चे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी सावदा पोलिसांकडून आवाहन केले आहे.