खान्देश क्रांती शेतकरी संघटनेचा महायुतीचे उमेदवार विजय कुमार गावित यांना पाठिंबा.नंदुरबार – खान्देश क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व त्याचा संपूर्ण संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे व महायुतीचे उमेदवार विजयकुमार गावित यांना पाठींबा देण्याचे ठरवले आहे.
खानदेश क्रांती शेतकरी संघटनेच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नंदुरबार मतदार संघ तसेच नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नांच्या बाबतीत तसेच शेतकऱ्यांना उत्कृष्ठ बियाणे, खते व नंदुरबार येथे कृषिनिविष्ठा प्रयोग शाळा चाचणी केंद्र, शेतकऱ्यांच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांचा विचार करता तसेच शेतकऱ्यांचे विविध अडचणींवर चर्चा करुन येणाऱ्या विधानसभेत नंदुरबार जिल्हाकरीता शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी व भविष्यकाळात महायुतीचे सरकार महाराष्ट्र राज्यात येण्याचे चिन्ह दिसत असल्याने नंदुरबार जिल्ह्याच्या तसेच खानदेशच्या शेती सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी खानदेश शेतकरी संघटना नंदुरबार विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विजयकुमार गावीत यांना खानदेश क्रांती शेतकरी संघटना खानदेशच्या विकासासाठी आज दि.१४ नोव्हेंबर २०२४ गुरुवार रोजी जाहीर पाठींबा देण्यात आला. नंदुरबार मतदार संघातील सर्व खानदेश शेतकरी संघटनेच्या कार्यकत्र्यांनी विजयकुमार गावीत यांच्या प्रचारात आघाडी घ्यावी असे यावेळी संघटनेचे राजाध्यक्ष अध्यक्ष बिपीन पाटील यांनी सांगितले.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील,खोडामली चे सरपंच प्रदीप पाटील सदस्य मंगलसिंग ठाकरे,आकाश चित्ते ,सिद्धार्थ चित्ते,भूषण पवार ,राज ठाकरे,आशिष पिंपळे,निलेश गुलालेनयन भिल ,सागर थोरात व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.