रांगोळ्या, फुलांच्या पाकळ्यांनी मार्ग सुशोभित करून भगवान नगरात आ. राजूमामा भोळे यांचे भव्य स्वागत

रांगोळ्या, फुलांच्या पाकळ्यांनी मार्ग सुशोभित करून भगवान नगरात आ. राजूमामा भोळे यांचे भव्य स्वागत भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार राजूमामा भोळे यांना शहरातून वाढला प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील भगवान नगर भागात पूर्ण गल्लीमध्ये सडा-समार्जन करून रांगोळ्या व फुलांच्या पाकळ्यांनी मार्ग सुशोभीत करून शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या वेळेला आबालवृद्धांसह महिला भगिनींनी औक्षण करून प्रत्येक घरातून पुष्पहार गळ्यात टाकून आ. राजूमामा भोळे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. नागरिकांचे प्रचंड प्रेम पाहून आ.राजूमामा भोळे यांनी भारावून जात आभार मानले. भूषण कॉलनी येथील काशी विश्वेश्वर मंदिर येथे पूजा करून आ. राजूमामा भोळे यांनी सोमवारी सकाळी पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली. तिथून कोल्हे नगर, मुंदडा नगर, अंबिका हौसिंग सोसायटी भगवान नगर, शास्त्रीनगर, रामानंदनगर, विवेकानंद नगर मार्गे वाघ नगर परिसरात प्रचार रॅलीचा समारोप झाला. मार्गात महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर आशाताई कोल्हे, माजी नगराध्यक्ष सिंधुताई कोल्हे, वसंतराव कोल्हे यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन ज्येष्ठांचे आ. भोळे यांनी आशीर्वाद घेतले.

माजी महापौर ललित कोल्हे यांच्या घरी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरिताताई माळी यांनी काढलेली “विश्वास जुना, राजूमामा पुन्हा” या शीर्षकाखालील रांगोळी रॅली दरम्यानची आकर्षण ठरली. रॅलीच्या शेवटी वाघ नगर परिसरात माजी नगरसेविका उषा संतोष पाटील यांच्या घरी भाजप,शिवसेना व महायुती पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये भाजप महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी महापौर ललित कोल्हे, माजी नगरसेवक गायत्री राणे, उषा पाटील, मंडळ क्रमांक ६ चे अध्यक्ष बापू कुमावत, अजित राणे, राजेंद्र खैरनार, संतोष पाटील,जीवन अत्तरदे, पिंटू बारी, चंद्रकांत बेंडाळे, रवि बारी, ओंकार राणे, विनोद भामरे, प्रवीण पाटील, ज्योती निंभोरे, रेखा पाटील, नीता काबरा जयश्री पाटील, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी कोल्हे, पियुष कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लता मोरे, विनोद देशमुख, जयश्री कदम, ममता तडवी, रिपाई आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, मिलिंद अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, महानगर जिल्हाध्यक्ष कल्पेश मोरे, विकी बागुल, सिद्धांत मोरे, बाबा म्हसदे, केतन वाणी, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.