भोलाणे – कानसवाडे – शेळगाव – कडगाव परिसरात गुलाबभाऊंचेच वारे ! शेळगाव येथे ट्रॅक्टरवर, भोलाणे येथे बग्गीतून तर कानसवाडे येथे घोड्यावरून रॅली ; समाज बांधवांचे मिळतंय भक्कम पाठबळ
जळगाव दि. 7- गुलाबराव पाटील यांचा प्रचार जोमाने सुरू असून, त्यांना सर्व समाज बांधवांचे भक्कम पाठबळ मिळत आहे. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव व त्यांच्या प्रेमापोटी शेळगाव येथे ट्रॅक्टरवर, भोलाणे येथे बग्गीतून तर कानसवाडे येथे घोड्यावरून भव्य रॅली काढण्यात येवून त्यांनी थेट जनतेशी संवाद साधत विकासाची हमी दिली. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रचारा दरम्यान शेतकरी वर्गाशी संवाद साधत अनोख्या शैलीने नागरिकांचे लक्ष वेधले. या ठिकाणी समाज बांधवांनी भक्कम पाठबळ दिले असून महिलांचा उत्स्फूर्त सहभागदेखील विशेषत्वाने जाणवला.
माजी महापौर ललित भाऊ कोल्हे, जि.प. चे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सभापती जनाआप्पा कोळी, जनजाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजू, सोनवणे, वसंत भालेराव, तुषार महाजन अजय महाजन, श्याम कोगटा, भोलाणे, कानसवाडे, शेळगाव व कडगाव येथील देविदास कोळी , नरेंद्र सपकाळे, नाना सोनवणे, कैलास कोळी, समाधान कोळी , सोमा कोळी , नरेंद्र सपकाळे, योगेश कोळी, नवल कोळी, किरण धनगर, युवराज कोळी , नाना सोनवणे, सरपंच संजय कोळी, नारायण कोळी, सुनील धनगर, कृष्णा कोळी, रामकृष्ण सोनवणे, योगेश कोळी, नंदू कोळी, गणेश पाटील, राजेश पाटील, योगेश पाटील, चेतन पाटील, विशाल सपकाळे, किरण धनगर, भूषण पाटील , अनिल कोळी मेघश्याम पाटील, पुंडलिक कोळी, कौतिक धनगर, समाधान पवार, सतीश पाटील, यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य महा युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.