जळगावात जुन्या भांडणावरून गोळीबार, कोयत्याने वार, दोघे तरुण जखमी

जळगावात जुन्या भांडणावरून गोळीबार, कोयत्याने वार, दोघे तरुण जखमी

जळगाव शहरात गुन्हेगारी पुन्हा वाढताना दिसत यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच शिल्लक नसल्याचं दिसून येत आहे. अशातच शहरातील वाघ नगर स्टॉपजवळ दुचाकीवरुन आलेल्या ६ ते ८ जणांच्या गटाने सशस्त्र हल्ला केला. गोळीबारात एकाच्या मांडीला गोळी चाटून गेली. तर दुसऱ्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केल्याने तो जखमी झाला. दोघा जखमींना जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरा रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. हल्लेखोराचा शोध सुरू होता. या घटनेबाबत असे की, शहरातील वाघ नगर स्टॉप परिसरात अक्षय सीताराम तायडे (वय-२६ रा.समता नगर) आणि (अक्षय सुरेश लोखंडे वय-२१ रा.समता नगर) हे दोन तरुण दुचाकी लावून उभे होते. दरम्यान, रात्री १० वाजेच्या सुमारास आठ ते दहा जणांचे टोळके त्याठिकाणी आले. त्यांनी दुचाकीजवळ उभ्या असलेल्या तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी टोळक्याने तरुणावर गोळीबार केला. यामध्ये अक्षय तायडे या तरुणाच्या मांडीला गोळी चाटून गेल्याने तरुण जखमी झाला.

टोळक्याने केलेल्या हल्ल्यात अक्षय लोखंडे या तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आला असून तो जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर टोळक्याने त्या तरुणांच्या दुचाकींची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांनी तेथील दगड उचलून दुचाकीवर टाकून त्यांचे नुकसान झाले. यामध्ये दुचाकी क्रमांक एमएच.१९.बीडी.८६२४ व एमएच.१९.ईडी.८८७९ क्रमांकाच्या दुचाकींचे नुकसान झाले आहे. या घटनमुळे परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान, वाद पूर्ववैमनस्यातून झाला असून दुपारी एका उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. रामानंद नगर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर घटना घडून देखील पोलिसांना त्याचा थांगपत्ता देखील नाही. तब्बल तासभराने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जिल्हा रुग्णालयात पोहचले. या प्रकरणी रात्री उशिरा रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. हल्लेखोराचा शोध सुरू होता.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.