बेकायदा लागवड केलेला गांजा पकडला! शहादा पोलिसांची कारवाई; 24 लाखांच्या मुद्देमालासह संशयित ताब्यात

बेकायदा लागवड केलेला गांजा पकडला! शहादा पोलिसांची कारवाई; 24 लाखांच्या मुद्देमालासह संशयित ताब्यात

हादा : शेतात बेकायदा गांजाची लागवड करण्यात आल्याचा पोलिसांनी मंगळवारी (ता. २२) पर्दाफाश केला असून, संशयिताकडून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. २४ लाख १० हजार २०० रुपये किंमतीचा दोन क्विंटल ४१ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा पकडण्यात आला आहे. शहादा पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना गांजाची शेती होत असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक राजन मोरे यांना मिळाली. त्यानंतर पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून कारवाई केली. घोटलेपाडा (ता. शहादा) या ठिकाणी शेतात गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती सोमवारी (ता. २१) सायंकाळी सहा वाजता शहादा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस शिपाई भरत उगले, पोलिस शिपाई दिनकर चव्हाण यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. खात्री झाल्यानंतर मंगळवारी (ता. २२) सकाळी पथकाने घोटळेपाडा येथे संशयित आरोपी गुमान ठोबल्या पावरा (रा. घोटाळेपाडा, ता. शहादा) याच्या शेतात दोन क्विंटल ३१ किलो ८०० ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशीर आढळून आला.

तसेच, याच परिसरात लंगडी भवानी (ता. शहादा) या ठिकाणी पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी दिलवर सिंग रायसिंग भिल (रा. लंगडी भवानी) याच्या शेतात आठ किलो २२० ग्रॅम वजनाचा गांजा बेकादेशीररित्या मिळून आला. दोन्ही संशयितांकडे मिळून २४ लाख १० हजार २०० रूपये किमतीचा दोन क्विंटल ४१ किलो किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा शेतात मिळून आला. पोलिस हवालदार योगेश थोरात यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक मराठे, उपनिरीक्षक राजपूत, पोलिस हवालदार योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी, विकास सिरसाठ, दिनकर चव्हाण, भरत उगले, योगेश माळी, आतीक पटेल, देवा विसपुते, युवराज राठोड यांनी केली. पथकातील सर्व कर्मचाऱ्यांचे पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अप्पर पोलिस अधीक्षक आशीष कांबळे, शहाद्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांनी कौतूक केले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.