वीज पडून मेंढपाळाच्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू.

वीज पडून मेंढपाळाच्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील घटना. तालुक्यात शुक्रवारी सांयकाळपासून वादळीवाऱ्यासह पावसाला जोरदार सुरुवात झाली होती. याच पावसात लोहारी गावाजवळ शेतात वीज पडून १४ वर्षीय बालक व एका शेळीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते. लोहारी गावाजवळ असलेल्या अनिल पाटील यांच्या शेतामध्ये शिवराम सिताराम शिंगाडे, त्यांची पत्नी मंगलाताई शिवराम शिंगाडे व त्यांचा मुलगा गोरखनाथ (रा. पिंप्राळा ता. नांदगाव जि. नाशिक) हे धनगर समाजाचे कुटुंब मेंढरं घेऊन मुक्कामाला होते. सायंकाळ पासून सुरु असलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने रात्री उग्र रुप धारण केले व वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच वेळी आपल्या मेंढ्यांच्या वाड्याजवळ बनवलेल्या कुपीमध्ये एका बाजूला शिवराम सिताराम शिंगाडे व त्यांची पत्नी तर दुसऱ्या बाजूला यांचा मुलगा गोरखनाथ शिवराम शिंगाडे वय वर्षे (१४) हा पाण्यापासून बचाव करत बसलेला होता.
नेमके याचवेळी रात्री साडे ९ वाजेच्या सुमारास अचानकपणे वीजेच्या कडकडाटासह पावसात मोठा आवाज झाला व वीज थेट गोरखनाथ शिवराम शिंगाडे यांच्या अंगावर पडल्याने त्याचा व जवळच असलेल्या एका शेळीचा जागीच मृत्यू झाला. ही बाब लक्षात आल्यावर शिंगाडे कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. लोहारी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व धनगर कुटुंबीयांना धीर दिला. तसेच सकाळी मयत गोरखनाथ याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.