गोरगरीबांसाठी मनसेचा दिवाळी “आनंदाचा शिधा” उपक्रम, हरीविठ्ठल नगर शाखेत फक्त २१ रुपये किलो दराने साखर वितरण..

गोरगरीबांसाठी मनसेचा दिवाळी “आनंदाचा शिधा” उपक्रम, हरीविठ्ठल नगर शाखेत फक्त २१ रुपये किलो दराने साखर वितरण..

जळगाव – दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे “आनंदाचा शिधा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गोरगरीब व गरजू परिवारांना फक्त २१ रुपये किलो दराने साखर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव वार्ड क्रमांक ११, मनसे महिला शाखा, हरीविठ्ठल नगर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता महिला शाखा कार्यालय, हरीविठ्ठल नगर येथे करण्यात आले आहे.

या प्रसंगी जळगाव शहरातील आजी-माजी पदाधिकारी तसेच अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महिलांनी येताना राशन कार्डची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मनसे महिला शाखेचा हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचे द्योतक ठरणार असून, “सेवेचा उत्सव म्हणजेच खरी दिवाळी” या भावनेने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

विनीत
राजेंद्र एस निकम
उपमहानगर अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहर
9422777566

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.