भडगावात निवडणुकीआधी मोठी राजकीय हालचाल; शिंदे सेनेचा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत….

भडगावात निवडणुकीआधी मोठी राजकीय हालचाल; शिंदे सेनेचा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत….

भडगाव तालुक्यातील राजकीय वातावरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलेच तापले आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नुकताच स्वबळाचा नारा दिल्यानंतर तालुक्यातील राजकारणात नवा कलाटणीबिंदू निर्माण झाला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर भारतीय जनता पक्षाकडून देखील रणनीती आखण्यास सुरुवात झाली असून, शिंदे सेनेचा एक प्रभावी गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय राजकीय सूत्रांकडून मिळाली आहे.

भडगाव नगरपरिषद : नेते उपस्थित नसल्याने बैठक टळली ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा गट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यास, शिंदे सेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, या गटात आमदार किशोर पाटील यांच्या काही विश्वासू सहकाऱ्यांचा समावेश असल्याचे देखील समोर येत आहे. येत्या दोन दिवसात मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत या गटाची निर्णायक बैठक होणार असून, त्यानंतर औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भडगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलताना दिसत आहेत. यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती (महिला) या प्रवर्गासाठी राखीव ठरल्यानंतर अनेक इच्छुकांचे गणित कोलमडले असून, नव्या नेतृत्वासाठी संधी निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून सौ. रेखा प्रदीप मालचे यांची घोषणा करण्यात आली. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, शिंदे सेनेने उमेदवार घोषित करताच शहरात निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. आता या निर्णयानंतर भडगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे सेनेसमोर कठीण आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. एकीकडे स्वबळाचा नारा आणि दुसरीकडे सहकाऱ्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेमुळे भडगावातील राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. आगामी काही दिवसांत कोण कुणाच्या बाजूने उभे राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.