रोटरी क्लब जळगावतर्फे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन…

वाचन प्रेरणा दिनानिमित्त रोटरी महावाचन अभियान..

जळगाव – येथील रोटरी क्लब जळगावतर्फे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन संस्कृती वाढविण्यासाठी, वाचन प्रेरणा दिनी रोटरी महावाचन अभियान आयोजित करण्यात आले आहे. बुधवार 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत गणपती नगरातील रोटरी सभागृहात होणाऱ्या रोटरी महावाचन अभियानात 1500 हून अधिक नागरिक किमान 10 मिनिटे वाचन करुन यात सहभागी होणार आहेत. एकत्रित वाचन कालावधी 15 हजार मिनिटे असा हा उपक्रम सुरू राहील.

हे अभियान सर्व नागरिक – विद्यार्थ्यांसाठी मोफत असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. मात्र नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सोबतच्या https://forms. gle/5P2aRV9Cyfg22umb8 लिंक वर क्लिक करून नोंदणी फॉर्म भरावयाचा आहे. प्रत्येक सहभागी वाचकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. रीडर स्पीक्स अर्थात वाचकांना लेखी व ऑडिओ व्हिडिओ स्वरुपात प्रतिसाद नोंदवण्याची किंवा अभिप्राय व्यक्त करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

वाचन अभियान सहभाग स्मृती म्हणून सेल्फी पॉईंटची निर्मिती आणि अभियानात सहभागी वाचकांना रीडर्स वॉलवर स्वाक्षरी करता येणार आहे. कुटुंब सदस्यांसह सहभागी झालेल्या परिवाराचा वाचक कुटुंब म्हणून फोटो काढण्यात येणार आहे. वाचनामुळे कल्पनाशक्ती वाढते, आत्मविश्वास वाढतो, ताण कमी होतो, भाषाशैली सुधारते, ज्ञान वाढते, निर्णयक्षमता वाढते, एकाग्रता सुधारते, सहिष्णुता वाढते, व्यक्तिमत्व घडते आणि जीवन समृद्ध होते.

त्यामुळे वाचन संस्कृती वृद्धिंगत करणाऱ्या या अभियानात जळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, प्रोजेक्ट चेअरमन विजय जोशी, को-चेअरमन पंकज व्यवहारे यांनी केले आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.