मातोश्री प्राथमिक विद्यालयात विद्यार्थी आरोग्य तपासणी…

मातोश्री प्राथमिक विद्यालयात विद्यार्थी आरोग्य तपासणी…

प्रबोधन संस्था संचलित मातोश्री प्राथमिक विद्यालय, जळगाव येथे माजी आमदार व संस्थापक अध्यक्ष, प्रबोधन संस्था, जळगाव तथा जळगाव प्रथमचे संयोजक ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलनाने झाले.

या वेळी प्रमुख पाहुणे डॉ. नितीन धांडे व त्यांचे सहकारी शेखर झांबरे, डॉ . आशिष पाटील, मुख्याध्यापक समाधान इंगळे उपस्थित होते. मुख्याध्यापक समाधान इंगळे यांनी प्रास्ताविकात संस्थाध्यक्ष ॲड .जयप्रकाश बाविस्कर यांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालवलेल्या मातोश्री प्राथमिक विद्यालयाचा आत्तापर्यंतचा प्रवास तसेच वेळोवेळी येणाऱ्या अडचणींवर मात करत तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त सोयीसुविधा शाळेतर्फे पुरविण्यासाठीची संस्थाध्यक्षांची तळमळ मांडली. संस्थाध्यक्ष ॲड जयप्रकाश बाविस्कर यांना त्यांच्या जन्मदिनी दीर्घायुष्य लाभण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

डॉ. नितीन धांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून योग्य व्यायामाचे महत्त्व पटवून सांगितले. पायांच्या बोटांवर व टाचेवर चालणे या व्यायामांचे फायदे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले. तसेच रोजच्या आहारात हळद , लिंबू आणि खजूर यांचा वापर वाढवण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक प्रश्न विचारण्याची संधीही मिळाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान ठाकरे यांनी केले. उपस्थित डॉक्टरांचा सविस्तर परिचय श्रीमती शारदा मोहिते यांनी करून दिला. आभार प्रदर्शन प्रमोद झलवार यांनी केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यानुसार पालकांना योग्य सूचना देण्यात आल्या. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.