जयहिंद लोकचळवळ आयोजित भडगावमध्ये भव्य मोफत आरोग्य शिबिर..

जयहिंद लोकचळवळ आयोजित भडगावमध्ये भव्य मोफत आरोग्य शिबिर..

भडगाव (प्रतिनिधी) – आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त जयहिंद लोकचळवळ भडगाव व एस.एम.बी.टी. हॉस्पिटल धामणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तपासणी व उपचार शिबिर शुक्रवारी (दि. २६ सप्टेंबर २०२५) श्री मारुती मंदिर, वरची पेठ, भडगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडले. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिराला शहर व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबिरामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचे आजार, पचनाचे आजार, स्त्रीरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा विकार आदी विविध आजारांची तपासणी करून तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मोफत औषधे, शस्त्रक्रिया सल्ला व पुढील उपचाराबाबत आवश्यक माहितीही देण्यात आली.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी भुषण पवार, भैय्यासाहेब पाटील, नितीन कोळी, जितेंद्र पाटील आणि व्हि.आर. महाजन सर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमात जयहिंद लोकचळवळ भडगाव समन्वयक अशुतोषकुमार पाटील, चेतन सोनवणे, श्रेयश कासार, यश पाटील, कपिल पाटील, नगरसेविका योजना योजना ताई पाटील, अॅण्ड मुकुंद पाटील, पत्रकार अशोक परदेशी, पत्रकार निलेश महाले, मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष डॉ. बी. बी. भोसले, दुर्गेश काळे, हर्षल काळे, गौरव काटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.आमदार सत्यजित तांबे यांच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या या शिबिरामुळे भडगाव व परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा मिळाल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आयोजकांनी सर्व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.