अनुलोम तर्फे सामाजिक शास्त्र प्रशाळात संविधानाची 75 कार्यक्रम कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात संपन्न…

अनुलोम तर्फे सामाजिक शास्त्र प्रशाळात संविधानाची 75 कार्यक्रम कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात संपन्न… नेमकं अनुलोम म्हणजे काय ? जाणून घ्या सविस्तर

जळगाव प्रतिनिधी ; अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम), मार्फत संविधान अमृत महोत्सव निमित्त संविधान 75 कार्यक्रम कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे आज आयोजित करण्यात आला होता. येथील सामाजिक शास्त्र प्रशाळा,येथे संविधानाची पंच्याहत्तरी कार्यक्रम यशस्वीरित्या झाला. कार्यक्रमाला वक्ते म्हणून निवृत्त पोलिस उपअधीक्षक पुंडलिक सपकाळे होते तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन सामाजिक शास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ.अजय पाटिल होते.

पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून मूलभूत अधिकार, मार्गदर्शन तत्वे, नागरिक कर्तव्य, संविधानापुढील धोके.-फुटीरतावाद,नक्षलवाद, भ्रष्टाचार, जातिवाद, प्रांतवाद, व्यसनाधीनता. यांचे परिणाम वक्त्यांनी विद्यार्थ्यांनसमोर मांडले .तर व्हिडीओ माध्यमातून महात्मा गांधींनी दिलेला सामाजिक संदेश . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेला संदेश व्हिडिओच्या माध्यमातून दाखविण्यात आला. अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम), ही संस्था 2016 पासून “सरकारी प्रयत्नांना जन सहभागाची साथ”हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करत आहे. सरकारी यंत्रणेला मदत व्हावी व तळा गाळापर्यंत योग्य लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ पोहोचावा विविध सामाजिक, शासकीय उपक्रमाच्या माध्यमातून”एकात्मिक विकासाच्या”उद्देशाने काम करत आहे. कार्यक्रमाची प्रास्ताविक अनुलोम उपविभाग संवादिनी नयना पाटील यांनी केले.

यावेळेस प्रशाळेतील प्रा. वर्षा पालखे, विनेश पावरा, योगेश माळी आणि अनुलोम संस्थेचे जनसेवक ऋषिकेश बारी, पवन येपुरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शैक्षणिक संस्था मध्ये अनुलोम संस्थेच्या माध्यमातून संविधानची पंच्याहत्तरी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.