पेन्सिलची भिंत , शिक्षणाची दिशा देणारे प्रतीक, ॲड जमील देशपांडे…

पेन्सिलची भिंत , शिक्षणाची दिशा देणारे प्रतीक, ॲड जमील देशपांडे…

जळगांव येथील लांडोरखोरी उद्यानात उभी केलेली पेन्सिलची भिंत पाहताना क्षणभर थांबावं लागतं. रंगीबेरंगी, उंचच उंच पेन्सिल ची भिंत सांगते, थांबा-शिका- लिहा आणि मगच पुढे जा..

पेन्सिल ही साधी वस्तू. पण तिच्यात माणसाला घडवणारी अपार शक्ती दडलेली आहे. तिच्या टोकावरून उमटणारे अक्षर केवळ कागद रंगवत नाही, तर विचार घडवतं, स्वप्नं साकारतं. पेन्सिलची धार जशी घासून-घासून तीक्ष्ण करावी लागते, तसंच आयुष्य ज्ञानाने, अनुभवाने परिपक्व होतं.

या भिंतीतून शिक्षणाचं महत्त्व जिवंत झालं आहे. निसर्गाच्या कुशीत उभ्या राहिलेल्या या पेन्सिली मुलांना, पालकांना आणि प्रत्येक पर्यटकाला सांगतात की शिक्षणाशिवाय प्रगती नाही.लिहिलेलं अक्षर हेच माणसाचं खरं वैभव आणि शिकत राहणं म्हणजेच सतत वाढत राहणं.

ही भिंत म्हणजे एक प्रतीक आहे माणसाच्या विकासाचा, ज्ञानाच्या वाटचालीचा. जंगलातल्या हिरव्या श्वासात उभी राहून ती जणू आपल्याला सतत स्मरण करून देते की “विद्या हीच खरी संपत्ती आहे.”

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.