अंधाराला छेद देणारी एक स्त्री उभी राहिली वैशाली झाल्टे. त्यांनी सुरू केलेले अभेद्या फाउंडेशनचे शिक्षणघर.

अज्ञानरूपी अंधारात पेटलेला आशेचा दिवा , अभेद्या फाउंडेशनचे शिक्षणघर ..

तांबापूर (जळगांव) झोपडपट्टी जिथे जीवन म्हणजे संघर्ष. आई-वडील कचऱ्यातून अन्न कमवतात, तर मुलं भूक, गरीबी आणि अंधाराशी झुंजत मोठी होतात. इथे शाळेची पायरी चढण्याआधीच आयुष्याच्या ओझ्याखाली लहानगे पिचून जातात. पण या अंधाराला छेद देणारी एक स्त्री उभी राहिली वैशाली झाल्टे. त्यांनी सुरू केलेले अभेद्या फाउंडेशनचे शिक्षणघर आज या वस्तीतील मुलांसाठी केवळ शाळा नाही, तर प्रकाशमार्ग आहे.

“शोभेचे दिवे लावून तात्पुरता उजेड करण्यापेक्षा, समाजातील अज्ञानरूपी अंधार नाहीसा करा, ज्ञानरूपी दिवा पेटवा” हा विचार त्यांनी कृतीत उतरवला आहे.  या शिक्षणघरात शाळाबाह्य, घरकामगार आणि कचरा गोळा करणाऱ्यांची लेकरं फळा, खडू, वही-पुस्तकांच्या ओळखीने उजळत आहेत. लहान हातात भिक्षेऐवजी पेन्सिल आली आहे.लहान डोळ्यांत भीतीऐवजी स्वप्न उमलत आहेत. हे केवळ अक्षरज्ञान नाही, तर आत्मविश्वास, संस्कार, समाजभान आणि उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. प्रत्येक मुलाचं शिकलेलं अक्षर म्हणजे त्यांच्या आयुष्यात उजळलेला एक नवा दिवा आहे.

अभेद्या फाउंडेशनचा हा प्रवास भावनिक आहे, पण टिकण्यासाठी तुमच्या आमच्या सहकार्याची गरज आहे. वह्या, पेन्सिली, पुस्तकं दान करा. आर्थिक मदत करून शिक्षणघराला आधार देऊ या. थोडा वेळ देऊन या मुलांना शिकवण्यात सहभागी होऊ या. वैशाली झाल्टे यांचा हा उपक्रम केवळ एका झोपडपट्टीसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी जागृतीचा संदेश आहे.
ज्या समाजाने मुलांच्या हातात पेन्सिल दिली, त्यानेच उद्याचं उज्ज्वल भविष्य घडवलं जाणार आहे. आज प्रत्येक सजग नागरिकासाठी हीच खरी कसोटी आहे. या मुलांचा आधार व्हा, त्यांच्या आयुष्यातील प्रकाशाचा दीप बना. ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान आहे.

वैशाली झाल्टे या जळगावातील सामाजिक कार्यकर्त्या समाजातील वंचित घटकांसाठी सतत लढा देत आहेत. अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवणारी स्त्री म्हणून त्यांची ओळख समाजात निर्माण झाली आहे. वंचित आणि शाळाबाह्य मुलांसाठी त्यांनी उभारलेले अभेद्या फाउंडेशनचे शिक्षणघर हा केवळ शिक्षणाचा उपक्रम नाही, तर अंधारलेल्या आयुष्याला दिलेला आशेचा किरण आहे. सामाजिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेणे, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष करणे आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा ध्यास घेणे ही त्यांची कामाची खास ओळख आहे.

वैशाली झाल्टे या फक्त एका शिक्षणप्रेमी स्त्रीपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर सामाजिक परिवर्तनासाठी झगडणारी, अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवणारी प्रेरणादायी महिला म्हणून त्यांना मान मिळत आहे. वैशाली झाल्टे यांच्या या अनोख्या कार्याला आभाळभर शुभेच्छा.. ॲड जमील देशपांडे अध्यक्ष मराठी प्रतिष्ठान, जळगांव

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.