भडगाव तालुक्यात मुसळधार पावसाचा तांडव ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

भडगाव तालुक्यात मुसळधार पावसाचा तांडव ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

भडगाव तालुक्यात गेल्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या संततधारेमुळे परिसरात पूरस्थितीचे गंभीर संकेत निर्माण झाले आहेत. रात्रभराच्या अविरत पावसामुळे भडगाव शहरातील कोल्हा नाला धोक्याच्या पातळीवर ओसंडून वाहू लागला असून आसपासच्या भागात पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या पाण्याचा वेग आणि नाल्याची पातळी लक्षात घेता तालुका प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यातील लहानमोठे नदीनाले भरून वाहण्याची शक्यता वाढल्याने अत्यावश्यक कामांशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, पशुधनास उंच व सुरक्षित ठिकाणी हलवावे, तसेच नदी-नाल्यांच्या काठावर पाणी पाहण्यासाठी जाणे टाळावे, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून, कुठल्याही प्रकारचे नुकसान, धोकादायक हालचाल किंवा दुर्घटना दिसल्यास तात्काळ प्रशासनास कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि नागरिकांच्या हालचालीत अडचणी निर्माण झाल्या आहेत. “सुरक्षितता प्रथम” हा संदेश देत प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक धोक्यात न पडता घरातच सुरक्षित राहण्याचे आणि अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.