कारपेंटर बांधवांसाठी विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठानचा उपक्रम.. ३५ ड्रिल व कटर मशीनचे वाटप, समाजात उत्साहाचे वातावरण..

कारपेंटर बांधवांसाठी विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठानचा उपक्रम.. ३५ ड्रिल व कटर मशीनचे वाटप, समाजात उत्साहाचे वातावरण..

जळगाव : विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठानतर्फे कारपेंटर बांधवांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून ३५ ड्रिल व कटर मशीनचे वाटप करण्यात आले.

भगवान विश्वकर्मा पूजनाने प्रारंभ.. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्री विश्वकर्मा भगवान यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. ज्येष्ठ समाजसेवक एम. टी. लुले, गोपाल देवरे, हरी लोहार, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, विद्यानंद मानकर बाळासाहेब पांचाळ, यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठानचे उद्घाटन झाले.

लकी ड्रॉचा आनंद.. लहान चिमुकल्याने पहिली पावती काढताच कारपेंटर बांधवांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पहिल्या क्रमांकावर कटर मशीनचे बक्षीस जाहीर होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

अध्यक्ष राजेंद्र निकम यांचे कौतुक.. कारपेंटर बांधवांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या निस्वार्थ कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. समाजासाठी दिलेला त्यांचा हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

सहकार्याची ग्वाही. या वेळी ॲड. जमील देशपांडे यांनी, “मी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे,” असे आश्वासन देत समाज एकत्रित राहण्याचे आवाहन केले.

संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी समाजाला संबोधित करतेवेळी संघटनेचे उद्दिष्ट सांगितले, विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठान ही संघटना समाज बांधव यांच्याकडून आर्थिक मदत घेणार नाही, तसेच ही संघटना राजकीय पक्षासाठी काम करेल. असे निकम यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये सांगितले.

यशामागील टीमवर्क.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास पाथरे, कैलास देवरे, समाधान निकम, आनंद देवरे, संदीप जगताप, ज्ञानेश्वर निकम यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले, तर आभार प्रदर्शन किरण खैरनार व गोविंद जाधव यांनी केले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.